एक्स्प्लोर

Me Honar Superstar Chhote Ustaad 2: श्रेयाचा मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स; 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2'चा प्रोमो व्हायरल

नुकताच 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-2' या शोचा (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Me Honar Superstar Chhote Ustaad 2: छोट्या पडद्यावरील  'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनचे परीक्षण सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), आदर्श शिंदे (Adarsh Shinde) आणि वैशाली सामंत (Vaishali Samant) हे करणार आहेत. नुकताच 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-2' या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये श्रेया गाढवे ही परफॉर्म करताना दिसत आहे.

'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-2' च्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, श्रेयाचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर सचिन पिळगावकर आणि आदर्श शिंदे हे स्टँडिंग ओव्हेशन देतात. ते पाहून श्रेयाच्या नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी येतं. यावर सचिन पिळगावकर  म्हणतात, ' तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण श्रेयाच्या चेहऱ्यावर जे हसू आहे, तेच तुम्हाला सर्व काही देऊन जाईल.' हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षक 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-2'  मध्ये श्रेयाचा परफॉर्मन्स पाहण्यास उत्सुक आहेत. 

पाहा प्रोमो:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) हा कार्यक्रम 10 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री वैदेही परशुरामी ही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे, असं म्हटलं जात आहे. आता 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2'  या कार्यक्रमात कोण-कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत?  या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. 

हा कार्यक्रम शनिवार ते रविवार रात्री 9 वाजता प्रेक्षक पाहू शकणार आहेत. 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' या कार्यक्रमाची विजेती शुद्धी कदम (Shuddhi Kadam) ही ठरली होती. या कार्यक्रमात राजयोग धुरी, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली ठक या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या कार्यक्रमात विविध कलाकारांनी हजेरी लावली होती. आता 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Me Honar Superstar Chhote Ustaad 2: सुरांची जुगलबंदी होणार, छोटे उस्ताद जादू करणार; 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2' चा नवा प्रोमो पाहिलात?

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Uma Hrishikesh Diagnosed With Endometriosis Shares Post: मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण, इंडस्ट्री सोडून थेट परदेशात झाली शिफ्ट
मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण
Star Pravah Halad Rusli Kunku Hasla Serial: स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Embed widget