(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Abdu Rozik : 'झलक दिखला जा 11' गाजवण्यास अब्दू रोझिक सज्ज! लाडक्या शिव ठाकरेला करणार सपोर्ट
Abdu Rozik In For Jhalak Dikhhla Jaa 11 : 'झलक दिखला जा 11'मध्ये अब्दू रोझिकची कमाल पाहायला मिळणार आहे.
Abdu Rozik Excited For Jhalak Dikhhla Jaa 11 : 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhhla Jaa 11) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा डान्सिंग रिअॅलिटी शो प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा कार्यक्रम गाजवण्यास अब्दू रोझिक (Abdu Rozik) सज्ज आहे. तसेच लाडक्या शिव ठाकरेलाही (Shiv Thakare) तो सपोर्ट करण्यास तो सज्ज आहे.
'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या कार्यक्रमाने बाजी मारली आहे. अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाच्या मंचावर आपल्या नृत्य अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. आता या लोकप्रिय कार्यक्रमात तजाकिस्तानचा लोकप्रिय गायक आणि 'बिग बॉस 16'चा स्पर्धक अब्दू रोझिक दिसणार असल्याची चर्चा आहे. अब्दूने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
'झलक दिखला जा 11'साठी अब्दू रोझिक उत्सुक!
'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमासाठी अब्दू रोझिक खूप उत्सुक आहे. सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. अब्दू रोझिक म्हणाला,"झलक दिखला 11' या कार्यक्रमाचा भाग होत असल्याचा मला आनंद आहे. आनंदात मी प्रवास सुरू करत आहे. माझ्या करिअरमध्ये भारतीयांचा मोलाचा वाटा आहे. इथे प्रेक्षकांचं मिळत असलेलं प्रेम खूपच आनंददायी आहे. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. म्यूझिक आणि डान्सच्या माध्यमातून धमाका करण्यासाठी मी सज्ज आहे".
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार, 'झलक दिखला जा 11' या कार्यक्रमात अब्दू रोझिक आणि शिव ठाकरे थिरकताना दिसणार आहेत. याआधी शिव ठाकरे आणि अब्दू रोझिक 'बिग बॉस 16' या कार्यक्रमात एकत्र दिसून आले होते. या कार्यक्रमातील त्यांची बॉन्डिंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
शिव ठाकरेला वोट करा; अब्दू रोझिकची चाहत्यांना विनंती
अब्दू रोझिक आणि शिव ठाकरे 'झलक दिखला जा 11' आधी 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) या कार्यक्रमात एकत्र दिसले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. या कार्यक्रमातील त्यांची जोडी आणि मैत्री आजही चर्चेत असते. अब्दूने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शिव ठाकरेला वोट करण्यासाठी चाहत्यांना विनंती केली आहे.
संबंधित बातम्या