Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर आर्याची पहिली प्रतिक्रिया, घडलेलं सगळं स्पष्टच सांगत म्हणाली...
Arya Jadhav Reaction on Bigg Boss Marathi : आर्या जाधवने म्हटलं आहे की, निक्कीने पहिली मला झापड मारली, त्यावर माझी रिॲक्शन निघाली.
Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडल्यावर आर्या जाधवची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यावर आर्या जाधवने चाहत्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला. सोमवारी आर्या जाधवने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत बिग बॉस मराठीच्या घरात घडलेला सगळं स्पष्ट सांगितलं आहे. दरवाजा उघडताना तिने मला गालावर झापड मारली, तेव्हा माझी रिअॅक्शन निघाली, असं आर्याने म्हटलं आहे.
बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?
आर्याने इंस्टाग्राम लाईव्हमध्ये म्हटलं आहे की, "पहिल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्कीची नखं मला लागली होती, तेव्हा मला वाटलं होतं, तिच्यावर काही अॅक्शन होईल. तिच्या कॅप्टन्सीमध्ये मी तिला त्रास देणार होती कारण तिने आमच्या ग्रुपच्या कॅप्टन्सीमध्ये त्रास दिला होता, तेव्हा मी ठरवलं होतं आता हिचं भरपूर झालं, आता सहन करायचं नाही. मला असं वाटतं की, तेव्हा मी पाहिलं जान्हवी मला ओढतेय आणि निक्कीने मला लाथ मारली, तेव्हा तिने सांगितलं की स्वत:ला फक्त अडवण्यासाठी केलं."
आर्या जाधवने स्पष्टच सांगितलं...
आर्या पुढे म्हणाली की, "मला वाटतं की, धक्का-बुक्कीच्या नावाखाली तुम्ही दरवेळी हिंसा करता, त्या माझ्यामध्ये खूप दिवसांपासून साचलेल्या भावना होत्या. नू नाही म्हणत, त्याच्यासाठी तिच्या हात उचलणं बरोबर की चुकीचं होतं. ते चूक होतं मला यासाठी वाटतं की, हिंसा चुकीची होती. पण यामागच्या भावना ज्या तुम्हाला जाणवत आहेत, ते तुम्हाला योग्य वाटतंय आणि त्याचसाठी तुम्ही मला पाठिंबा देताय. तुम्ही पाहिलंय की, ती हे सुरुवातीपासून सगळ्यांसोबत करतेय. निक्कीने बाथरुमचा दरवाजा उघडताना स्ट्रॅटिजीकली मला मारलं. दरवाजा उघडताना तिने मला गालावर झापड मारली, तेव्हा माझी रिअॅक्शन निघाली."
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :