Aarya Jadhao : 'हे घर तुझं आहे त्यामुळे हक्काने ये...जशी मी आर्याची आई तशीच तुझी', सूरजसोबत आर्याच्या आईचा खास संवाद
Aarya Jadhao : जशी मी आर्याची आई तशीच तुझी आई आहे, असं आर्याच्या आईने सूरजला म्हटलं. त्यांचा हा खास संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Suraj Chavan : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि आर्या जाधव (Aarya Jadhao) यांच्यामध्ये बहिण-भावाचं एक घट्ट नातं तयार झालं होतं. निक्कीच्या कानशिलात लगावल्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं. पण सूरज हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विनर ठरला. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्याने सूरजचं घराबाहेर आल्यानंतर भरभरुन कौतुक केलंय. नुकतच आर्यानेही सूरजसोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच तिच्या आईनेही सूरजसोबत संवाद साधला आहे.
आर्याच्या आईने यावेळी सूरजला अमरावतीला येण्याचं निमंत्रण दिलं. त्याचप्रमाणे हे तुझंच घर आहे, त्यामुळे हक्काने यायचं असंही यावेळी त्यांनी सूरजला म्हटलंय. सध्या सोशल मीडियावर या दोघांचा हा खास संवाद बराच व्हायरल होत आहे. आर्याने तिच्या सोशल मीडियावरुन हे व्हिडीओ शेअर केले आहेत.
आर्याच्या आईने साधला सूरजसोबत संवाद
आर्याच्या आईने सूरजसोबत संवाद साधताना म्हटलं की, तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तू ये आमच्याकडे...अमरावतीला ये आणि राहायला ये... सूरज हे तुझं घर आहे.. तू आर्याचा भाऊ आहेस... मग हे घरही तुझं आहे..हे तू कायम लक्षात ठेव की,अमरावतीमध्ये तुझं घर आहे. इथे तुझी बहिण आहे.. हे नातं शेवटपर्यंत निभवायचं... त्यावर सूरजने म्हटलं की, मी असा माणूस आहे की, हे नातं मी शेवटपर्यंत निभावणार...शेवटपर्यंत ही तुझी बहिण राहणार आणि मी शेवटपर्यंत तुझी आई राहणार...जशी मी आर्याची आई तशी तुझी आई.. हे घर तुझंय त्यामुळे हक्काने यायचं...
'माझी बहिण मला कुठं सोडून गेली काय माहित...'
सूरजने आर्याला फोन केला तेव्हा आर्याला सुरुवातीला कळलं नाही कोण बोलतंय. त्यावर आर्याने विचारलं की, सूरज बोलतोय का... तेव्हा सूरज म्हणाला हो... त्यावर आर्याने आनंदानं म्हटलं की, भावा कुठे आहेस...त्यावेळी सूरजने तिला म्हटलं की, आहे इथेच..माझी बहिण मला कुठं सोडून गेली काय माहित..त्यावर आर्याने त्याला म्हटलं की, भावा तुला कुठे सोडून जाणार मी..कसा आहे तू.. त्यानंतर आर्या आणि सूरजमध्ये व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद झाला.