Marathi Serial : महाराष्ट्राच्या पावनभूमीत होणार 'आई तुळजाभवानी'चे आगमन! मार्गशीर्ष महिन्यात रंगणार मालिकेचा रंजक भाग
Marathi Serial : 'आई तुळजाभवानी' या मालिकेत आता आई तुळजाभवनीचं आगमन होणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.

Marathi Serial : महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी' या 'कलर्स मराठी'वरील (Colors Marathi) मालिकेत आतापर्यंत आई तुळजाभवानीने भक्त रक्षणासाठी केलेले अनेक चमत्कार आणि घटना पाहायला मिळालं आहेत. नुकत्याच आलेल्या भागांत पाहायला मिळालंय की, 'आई तुळजाभवानी'ने तिच्या सर्वात लाडक्या भक्ताचे म्हणजेच अनुभूति आणि तिच्या बाळाचे प्राण वाचवले. महिषासूराचे खरे रूप समोर येताच तिने रौद्र रूप धारण केलेले,मात्र बाळाच्या रडण्याने तिच्यातले मातृत्व जागृत झाले.
देवीचा आईपणाचा हा भावनिक प्रवास ह्रदयस्पर्शी आहे. आता अनुभूति मातेचा आश्रम सोडून आई तुळजाभवानीचा नवा प्रवास सुरू होणार आहे.ज्या प्रदेशाची ती कुलस्वामिनी होणार आहे. 'आई तुळजाभवानी' या मालिकेचा मार्गशीर्ष महिन्याच्या शुभ मुहूर्तावर विशेष भाग पार पडणार आहे. सह्यगिरीच्या कुशीत, महाराष्ट्राच्या पावनभूमीवर कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी'चे आगमन होणार आहे. तुळजाभवानी निस्सीम भक्त आबासाठी ती दक्षिणेकडे येणार आहे. तिचे या दुष्काळी भागात येणे आणि त्यापाठचे तिचे प्रयोजन, भक्त रक्षणाचे घडणारे चमत्कार पण बरोबरीने तिने लोकांमध्ये जागवलेली अस्मिता हा उत्कंठावर्धक कथाभाग यादरम्यान उलगडेल.
अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी'ची गाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगताना पाहायला मिळत आहे. 'आई तुळजाभवानी'ची भूमिका अभिनेत्री पूजा काळे साकारत आहे. पूजा काळे ही भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने विशारद पूर्ण केलं आहे. तसेच कथ्थकचंही शिक्षण तिने घेतले आहे.
'आई तुळजाभवानी' मालिकेतील मुख्य भूमिकेबद्दल पूजा काळेने प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की, "आई तुळजाभवानी'ची भूमिका साकारताना आसपास खूप सकारात्मक ऊर्जा जाणवतेय. पहिली मालिका आणि आव्हानात्मक भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे. प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ उतरेन".
View this post on Instagram























