(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत नवं वळण; अरुंधती अखेर परदेशी जाणार
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत आजपासून अरुंधतीच्या परदेशवारीला सुरुवात झाली आहे.
Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या मालिकेत आजही नव-नवे ट्विस्ट येत आहेत. आता या मालिकेत रंजक वळण आलं आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत आजपासून अरुंधती दिसणार नाही. अरुंधतीच्या परदेशवारीला अखेर सुरुवात झाली आहे.
अरुंधतीच्या आनंदात कुटुंबीय सहभागी
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात अरुंधती परदेशवारीसाठी जाणार आहे. त्यामुळे तिला शुभेच्छा देण्यासाठी आप्पा आणि ईशा केळकरांच्या घरी पोहोचतात. तर संजना आणि अनघादेखील तिला व्हिडीओ कॉल करुन शुभेच्छा देतात. अरुंधतीच्या रक्षणासाठी आप्पा तिला सरस्वतीची मूर्ती भेट म्हणून देतात. तसेच यश आणि अनिश गिटारवर तिची सहभागी होतात. एकंदरीतच अरुंधतीच्या आनंदात कुटुंबीय सहभागी झालेले पाहायला मिळाले आहेत.
अनिरुद्धने केलेला घोळ नितीनच्या लक्षात येणार
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात अरुंधती परदेशी जाणार असल्याने आशुतोष तिला एअरपोर्टवर सोडायला डातो. दरम्यान नितीन वीणाने सही केलेलं कॉन्ट्रॅक्ट वाचतो आणि अनिरुद्धने घोळ घातल्याचं नितीनच्या लक्षात येतं. त्यानंतर आशुतोषला तो यासंदर्भात माहिती देतो. तसेच अनिरुद्धने वीणाच्या कंपनीत स्वत:ला 50 टक्के भागीदार करुन घेतल्याचंही त्यांच्या लक्षात येतं. वीणाला हे कळल्यानंतर तिलाही मोठा धक्का बसतो आणि अरुंधतीचं बोलणं तिला आठवतं. अनिरुद्ध विश्वास ठेवण्यायोग्य नाही, असं अरुंधतीने वीणाला सांगितलं होतं.
अनिरुद्धने फसवणूक केल्यानंतरही वीणा त्याची बाजू घेणार?
वीणाला आपल्या बाजूने करण्याचा अनिरुद्धचा डाव एकीकडे साध्य होत आहे. तो वीणाला म्हणतो की,"तुला जर हे चुकीचं वाटत असेल तर कॉन्ट्रॅक्ट फाडून टाक. मी तुझा पार्टनर आहे. जर मला प्रत्येक निर्णय घेताना नितीन आणि आशुतोषचं ऐकावं लागणार असेल तर मला या बिझनेसमध्ये काहीस रस नाही". त्यानंतर अनिरुद्ध ते कॉन्ट्रॅक्ट फाडायला जातो. दरम्यान वीणा त्याला थांबवते. त्यामुळे अनिरुद्धने फसवणूक केल्यानंतरही वीणी त्याची बाजू घेणार का याकडे मालिकाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
दुसरीकडे सुलेखा ताई आणि आशुतोषला नितीन समजावणार आहे की, वीणाला अनिरुद्धपासून सावध करायला हवं. पण आशुतोषला मात्र वीणाच्या कंपनीत लुडबूड करायची नाही आहे. त्यानंतर त्यांचं बोलणं वीणा ऐकते आणि म्हणते,"तुम्ही सगळे अनिरुद्धच्या मागे का लागले आहात?".
संबंधित बातम्या