Milind Gawali 'अल्ला सुद्धा तिचं सगळं ऐकायचे...'; आई कुठे काय करते मालिकेतील मिलिंद गवळींची पोस्ट
अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

Milind Gawali: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिकेला अनेक प्रेक्षक आवडीनं बघतात. या मालिकेमध्ये अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे अनिरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंद हे सोशल मीडियावर आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच मलिंद हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या पोस्ट देखील शेअर करतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला.
मिलिंद यांनी त्यांच्या आईसोबतचे काही फोटो शेअर केले. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" आज चौदा वर्ष पूर्ण झाली माझ्या आईला जाऊन, 2 मार्च 2009 संध्याकाळी 6 वाजता गुरु गुरुमाई चित्विलासानंद यांचा जप करत करत ती निघून गेली, अफाट श्रद्धा आणि प्रेम, श्रद्धा आणि सबुरी हे तिचं ब्रीदवाक्य होतं.'
"मुंबईच्या महालक्ष्मीने मुंबईत राहायला घर दिलं, शेगावच्या गजानन महाराजांनी मुलाचे शिक्षण पूर्ण केलं. वैष्णव देवीने नवऱ्याला नोकरीत यश दिलं, तिच्या प्रेमाच्या माणसांना जे काय हवं असेल ते ती परमेश्वराकडून मागून घ्यायची आणि त्याला द्यावं लागायचं, त्याला नवस बोलायची आणि तो नवस ती आवर्जून फेडायची, संतोषी मातेचे व्रत असो, नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असो, गुरुवारचा साईबाबाचा उपास तर सोमवारी शंकराचा उपवास, शनिवारी शनीचा उपवास, बुधवारी माहीम चर्चला जायचं, मदर मेरीशी सुद्धा तिची मैत्री होती, शुक्रवारी माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यात जायचं, ती अशी होती की अल्ला सुद्धा तिचं सगळं ऐकायचे," असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं.
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, "मला तर खात्रीच वाटते की आई आता कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी बरोबर गप्पा मारत बसली असेल, तुळजापूरच्या भवानी मातेची सेवा करत बसली असेल, किंवा शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरात, किंवा मग सिद्धिविनायकाला मोगऱ्याचे गजरे करुन देत असे आणि ते करत असताना त्यांना आपल्या लेकरांना आपल्या माणसांना सुखी ठेव हेही सांगत असेल. मातृ देवो भव."
View this post on Instagram
मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते सध्या आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:























