Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मध्ये पाहायला मिळणार अभिषेक-अनघाच्या लग्नाचा थाट
Aai Kuthe Kay Karte : संगीत सोहळ्यासाठी देशमुख कुटुंबाची रेट्रो लूकला पसंती
![Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मध्ये पाहायला मिळणार अभिषेक-अनघाच्या लग्नाचा थाट aai kuthe kaay karte serial abhishek and anagha wedding Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मध्ये पाहायला मिळणार अभिषेक-अनघाच्या लग्नाचा थाट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/50e10bac1e6b2def8b50c877b88aa2f1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aai Kuthe Kay Karte : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सध्या या मालिकेत अभिषेक आणि अनघा यांच्या विवाह सोहळ्याची तयारी सुरू आहे.बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी संपूर्ण देशमुख कुटुंब उत्साहात असून खास संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय.
संगीत सोहळ्यात देशमुख कुटुंबाने रेट्रो लूक धारण केलाय. अनिरुद्ध-संजना, अभिषेक-अनघा, माई-अप्पा, यश-गौरी आणि इशाने सदाबहार मराठी गाण्यांवर ठेका धरत संगीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत केली आहे. या संगीत सोहळ्यात आशुतोषही सामील झाला आहे. अरुंधती आणि आशुतोषमधील ही वाढती मैत्री अनिरुद्धला मात्र खटकते आहे. त्यामुळे एकीकडे आनंदाचं वातावरण असताना अनिरुद्ध मात्र अस्वस्थ आहे.
देशमुख कुटुंबातला हा अनोखा विवाहसोहळा मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे. आई कुठे काय करते या मालिकेत मधुराणी प्रभुलकर, रूपाली भोसले, मिलिंद गवळी आणि गैरी कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारतात.‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना म्हणजेच रुपाली भोसलेचा काल 38वा वाढदिवस होता. तिच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. मधुराणी प्रभुलकर या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकरतात. तर अभिनेता मिलिंद गवळी या मालिकेत अनिरूद्ध हू भूमिका साकरतात.
संबंधित बातम्या :
Katrina Vicky Wedding Card : कडेकोट बंदोबस्त, मोबाईलला बंदी तरी कतरिना-विकीच्या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडिया व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)