(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Priyadarshani Indalkar : महिला दिनानिमित्त मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा खास उपक्रम, 'फुलराणी'नं शेअर केला स्पेशल किस्सा
Priyadarshani Indalkar : प्रियदर्शनीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ट्रॅफिक पोलिसांसोबतचा किस्सा शेअर केलाय.
Priyadarshani Indalkar Social Media Post : जागतिक महिला दिनानिमित्ताने (International Women's Day) अनेक खास उपक्रम बऱ्याच जणांकडून राबवण्यात आले. असाच एक उपक्रम मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) राबवण्यात आला आहे. याबाबत एका अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत हा किस्सा सांगितला. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshani Indalkar) ही तिच्या फुलराणी (Phulrani) या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. तिनेच मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या महिला दिनानिमित्ताने राबवण्यात आलेल्या खास उपक्रमाचं कौतुक केलं आहे.
प्रियदर्शनीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा किस्सा शेअर केलाय. महिला दिनानिमित्त महिला ड्रायव्हर्सना मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून फुलं देऊन त्यांचा आजचा दिवस खास करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. प्रियदर्शनीला देखील पोलिसांनी असंचं फुल देऊन तिचा फोटो काढला. महिला दिनानिमित्ताने आम्ही हा उपक्रम राबवत असल्याचं ट्रॅफिक पोलिसांनी यावेळी सांगितलं. पोलिसांनी तिला दिलेल्या फुलासोबत तिने तिचा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केलाय. तसेच तिने तिच्या या फोटोबरोबर पोलिसांचा देखील केलाय.
प्रियदर्शनीनं काय म्हटलं?
प्रियदर्शनीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केलाय. त्याच तिनं म्हटलं की, मी आज जेव्हा बाहेर जात होते, ते ट्रॅफिक पोलिसांनी सुरुवातीला माझी गाडी अडवली. थोडी भीती वाटली, त्यानंतर त्यांनी मला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. तेव्हा त्यांनी काच खाली करुन मला एक फूल दिलं. त्यावर त्यांनी मला सांगितलं की, आज महिला दिननानिमित्ताने आम्ही सगळ्या महिला चालकांना हे फूल देत आहोत. मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या या उपक्रमामुळे प्रियदर्शनी फारच भारावून गेल्याचं पाहायला मिळालं.
हास्यजत्रेतून प्रियदर्शनी पोहचली घराघरात
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या क्रार्यक्रमातून प्रियदर्शनी घरोघरी पोहचली. त्यानंतर तिच्या फुलराणी या चित्रपटामुळे ती मोठ्या पडद्यावर झळकली होती. . वेगवेगळ्या भूमिका साकरत तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिला सावित्रीची लेक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रियदर्शनी मूळची पुण्याची आहे. तिने इटीव्ही मराठीवरिल अफलातून लिटिल मास्टर्स या शोमधून पदार्पण केले होते.