Tejasswi Prakash : ‘नागिन’ फेम तेजस्वी प्रकाशच्या हातावर दिसली करणच्या नावाची मेहंदी! आता चाहते विचारतायत...
Tejasswi Prakash : एकमेकांसाठी नेहमीच काहीतरी खास करणाऱ्या करण-तेजस्वीची जोडी नेहमीच चर्चेत असते. दरम्यान आता तेजस्वीच्या हातावरील मेहंदीचा फोटो समोर आला आहे.
Tejasswi Prakash-Karan Kundrra : छोट्या पडद्यावरची अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundrra) यांची जोडी चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजते आहे. सलमान खानच्या ‘बिग बॉस 15’च्या घरात हे दोघे एकमेकांच्या जवळ आले. इथून सुरु झालेले त्यांचे नाते ‘बिग बॉस’च्या घराबाहेरही टिकून राहिले आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ही जोडी अनेकदा एकत्र स्पॉट होत असते. तर, दोघांनीही लवकरात लवकर लग्न करून एकमेकांचे कायमचे सोबती व्हावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे.
एकमेकांसाठी नेहमीच काहीतरी खास करणाऱ्या करण-तेजस्वीची जोडी नेहमीच चर्चेत असते. दरम्यान आता तेजस्वीच्या हातावरील मेहंदीचा फोटो समोर आला आहे. या मेहंदीमध्येही खास करणच्या नावाचा ‘के’ लिहिण्यात आला आहे. हा फोटो स्वतः करण कुंद्राने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्याने ‘गजनी’ चित्रपटातील ‘कैसे मुझे तुम मिल गयी’ हे गाणे देखील शेअर केले आहे.
पाहा फोटो :
करण कुंद्राने हा क्युट फोटो शेअर केल्यानंतर त्यांचे चाहते देखील खुप खुश झाले आहेत. त्या या फोटोला रीपोस्ट करत चाहते या जोडीचं कौतुक करत आहेत. काही चाहते या फोटोला सगळ्यात रोमँटिक फोटो म्हणत आहेत, तर काही त्यांना लग्नाची तयारी सुरु झाली का?, असा प्रश्न विचारत आहेत. अर्थातच सगळ्या चाहत्यांना या जोडीच्या लग्नाची घाई झाली आहे.
कधी करणार लग्न?
नुकत्याच एका मुलाखतीत करण कुंद्रा याने ‘लग्न कधी करणार?’ या प्रश्नाचं उत्तर दिलं. अभिनेता म्हणाला, ‘सध्या मी कामात खूप व्यस्त आहे. शिवाय घरच्यांचाही कामाला पाठींबा आहे. लग्न करण्यासाठी कुटुंबाकडून कोणतेही प्रेशर नाही. मनात आलं तर, आताही लग्न करू शकतो, पण काही गोष्टी अजून मार्गस्थ करायच्या आहेत.’ तेजस्वीसोबतच्या नात्याविषयी बोलताना तो म्हणाला, ‘मी आणि तेजस्वी खूप सारखे आहोत. आमच्या बहुतांश गोष्टी जुळतात. त्यामुळे आमचं नातं आणखीनच घट्ट होत चाललं आहे. आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहोत.
संबंधित बातम्या