'वीण दोघांतली ही तुटेना ' मालिका सोडण्यासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांवर तेजश्री प्रधान संतापली, म्हणाली आपल्या अर्धवट ज्ञानाने ....
या अफवांना अखेर तेजश्रीने एक पोस्ट करत पूर्णविराम दिला आहे. तिने संबंधित माध्यमांना फटकारत चाहत्यांना स्पष्टीकरण दिलं आहे.

Tejashree Pradhan: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ' वीण दोघातली ही तुटेना' सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अलीकडेच तेजश्रीने आपल्या instagram स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला होता, नवीन वेब सिरीज, नवीन कामाची सुरुवात असं कॅप्शन दिलं होतं. हे पाहून तिचे चाहते आनंदी झाले असले तरी सोशल मीडियावर तेजश्री 'वीण दोघातली ही तुटेना' मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगली. अनेक माध्यमांनी तेजश्री मालिका सोडत असल्याचंही म्हटल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. या अफवांना अखेर तेजश्रीने एक पोस्ट करत पूर्णविराम दिला आहे. तिने संबंधित माध्यमांना फटकारत चाहत्यांना स्पष्टीकरण दिलं आहे. (Marathi Serial)
मालिका सोडण्याची अफवा, तेजश्रीने दिलं स्प्ष्टीकरण
तेजश्रीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती एका व्यक्तीशी संवाद साधताना दिसत होती. या व्हिडिओला तिने नवीन वेब सिरीज नवीन कामाची सुरुवात असं कॅप्शन दिलं होतं. हे पाहून चाहते आनंदी झाले असले तरी सोशल मीडियावर तेजश्री वीण दोघातली ही तुटेना मालिका सोडणार का? अशी अफवा पसरली. काही वृत्त माध्यमांनी तेजश्री मालिका सोडणार असल्याचे वृत्त दाखवल्याने चाहत्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला. हा गैरसमज दूर करण्यासाठी तेजश्रीने एक पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं की ती मालिका सोडत नाहीय .तिने instagram स्टोरी ठेवत संबंधित वृत्त माध्यमांनाही चांगलंच खडसावलं आहे .

तिने लिहिलं, "प्रिय मीडिया रिपोर्टर्स, 'वीण दोघांतली ही तुटेना' ही माझी मालिका सोडण्याचा माझा कुठलाही विचार नाही... तरीही आपल्या अर्धवट ज्ञानाने व्ह्यूज वाढवण्यासाठी बातम्या छापून आणू नयेत. ही झी मराठीशी असलेली वीण तुटणे नाही. लोभ असावा." तिच्या या पोस्टनंतर मालिकेचे व तेजश्रीचे चाहते सुखावले आहेत .
मालिकेच्या पुढील भागांविषयी उत्सुकता वाढली
सध्या या मालिकेत समर आणि स्वानंदीच्या लग्नानंतर कथानकात नवे वळण येणार असल्याचं समजतंय. त्यामुळे पुढील भागांविषयी उत्सुकता आणखी वाढली आहे. तेजश्री प्रधानचा अभिनय प्रवास पाहिला तर तिने झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता ‘वीण दोघांतली ही तुटेना’मधील तिचा अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.























