Tanushree Dutta On Sushant Singh Rajput: सुशांत सिंहसोबत जे जे घडलं, तेच माझ्यासोबत होतंय; तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप, म्हणाली, मी ज्या ठिकाणी जाते...
Tanushree Dutta On Sushant Singh Rajput: माझ्या घरातील कर्मचारी महिलेने माझ्या अन्नत काही तरी मिसळलं होतं. माझी शुद्ध हरपायची, असा खळबळजनक दावा तनुश्री दत्ताने केला आहे.

Tanushree Dutta On Sushant Singh Rajput: भारतात #MeToo चळवळीची सुरुवात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) नुकताच इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगत आहेत की, गेल्या 4-5 वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरात छळ होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. तसेच घरात मानसिक त्रासाला तसेच शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. तसेच नाना पाटेकर (Nana Patekar) आणि गँग त्रास देत असल्याचा आरोपही तनुश्रीने केला आहे. एबीपी माझाशी बोलताना अभिनेता सुशांत सिंह रजपूतसोबत जे जे घडलं, ते माझ्यासोबत होतंय, असा खळबळजनक आरोपही तनुश्री दत्ताने केला आहे.
तनुश्री दत्ता काय काय म्हणाली?
तनुश्री दत्ता एबीपी माझाशी बोलताना म्हणाली की, माझ्या विरोधात लोकांमध्ये वेगळी धारणा निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहेत. माझ्या घरातील कर्मचारी महिलेने माझ्या अन्नत काही तरी मिसळलं होतं. माझी शुद्ध हरपायची, असा खळबळजनक दावा तनुश्री दत्ताने केला आहे.
सुशांत सिंहसोबत जे जे घडलं, तेच माझ्यासोबत होतंय-
उज्जैनला गेले तिथे मी बसलेल्या रिक्षाचा अपघात झाला. नाना पटोलेंसारख्या बॉलिवूडमध्ये असलेली टोळी हे करत असेल. सुशांत सिंग राजपूत सोबत हेच झालं. जे सुशांतसोबत घडलं, ते सगळं माझ्यासोबत घडतंय. पण मला सुशांतच्या प्रकरणाबाबत सगळी माहिती असल्यामुळे मी सतत वाचतेय, मला याबाबत कळतंय, असा दावा तनुश्री दत्ता हिने केला आहे.
कोण आहे तनुश्री दत्ता?
तनुश्री दत्ता ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने 2004 मध्ये 'मिस इंडिया' स्पर्धा जिंकली होती. तनुश्री दत्ताचा जन्म 19 मार्च 1984 रोजी झाला. तिने कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे. 2005 मध्ये तिने 'Sssshhh...' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 2018 मध्ये, तिने #MeToo चळवळीमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप करून खळबळ उडवून दिली होती. 2018 मध्ये, तनुश्री दत्ताने #MeToo चळवळीमध्ये अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. तिने नाना पाटेकर यांच्यासह अनेक जणांवर आरोप केले आणि या आरोपांमुळे बराच वाद निर्माण झाला.

























