मला माफ कर.. माझ्यामुळे तुलाही टीकेला सामोरं जावं लागलं, अंकिता लोखंडेची बॉयफ्रेण्डसाठी पोस्ट
अंकितापासून वेगळं झाल्यावर सुशांतसिंहने आपले संबंध रिया चक्रवर्तीसोबत जोडले. तसे अंकितालाही नवा जोडीदार मिळाला. त्याचं नाव विकी जैन.सुशांत गेल्यानंतर इतका काळ उलटून गेल्यानंतर अंकिताने विकीला उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. यात आपल्याला विकी गवसल्याबद्दल देवाचे आभार मानतानाच तूच कसा माझ्या आयुष्यातला सोलमेट आहेस असंही तिने सांगितलं आहे.
मुंबई : "मला माफ कर माझ्यामुळे तुलाही टीकेला समोरं जावं लागलं. खरंतर तू या टीकेचा धनी बिलकूल नाहीस. पण माझं भाग्य चांगलं की तू माझ्या आयुष्यात आलास. माझा जोडीदार झालास. हे बोल आहेत," अभिनेत्री अंकिता लोखंडेचे. आपला प्रियकर विकी जैनला अंकिताने असं सांगितलं आहे.
सुशांतसिंह राजपूतची दीर्घकाळ राहिलेली प्रेयसी म्हणून अंकिता लोखंडेकडे पाहिलं गेलं. 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे सुरु झालेला त्यांचा प्रवास व्यक्तिगत जीवनातही सुखकर बनला. अनेक वर्षं हो दोघे एकत्र राहात होते. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्यानतर पुन्हा एकदा अंकिता लोखंडेचं नाव चर्चेत आलं. एकीकडे सुशांतच्या मृत्यूचं गूढ वाढत असतानाच सुशांतसोबत राहणाऱ्या रिया चक्रवर्तीचं नाव यात आलं. तेव्हा अंकिताने केलेले ट्वीट्स, इन्स्टा पोस्टही चर्चेत आल्या. सुशांतच्या जाण्यानंतर अंकिताही सोशल मीडियावर व्यक्त होण्याचं टाळू लागली. या सगळ्या प्रकरणात अंकिताचा रोख हा रियावर होता हे अप्रत्यक्षरित्या सिद्ध झालं होतं. पण यात अंकिताने आपलं व्यक्तिगत आयुष्य यात येऊ दिलं नव्हतं. जसं अंकितापासून वेगळं झाल्यावर सुशांतसिंहने आपले संबंध रिया चक्रवर्तीसोबत जोडले. तसे अंकितालाही नवा जोडीदार मिळाला. त्याचं नाव विकी जैन.
सुशांत गेल्यानंतर इतका काळ उलटून गेल्यानंतर अंकिताने विकीला उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. यात आपल्याला विकी गवसल्याबद्दल देवाचे आभार मानतानाच तूच कसा माझ्या आयुष्यातला सोलमेट आहेस असंही तिने सांगितलं आहे. शेवटी, या सगळ्या प्रकरणात तुलाही अनेकदा स्पष्टीकरणं द्यावी लागली. काहीवेळी टीका झाली.. खरंतर तुझा त्याच्याशी संबंध नव्हता पण तरीही तू ते मोठ्या मनाने स्वीकरालं आणि त्याच्याशी दोन हात केलेस. याबद्दलही तिने विकीचे आभार मानले आहेत.
सुशांतसिंह गेल्यानंतर कंगनासह अनेकांनी त्याच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली होती. यात कंगना रनौत, शेखर सुमन आदी कलावंताचा समावेश होतो. अंकितानेही आपली बाजू माध्यमांसमोर मांडली होती. सुशांत कसा गुणी मुलगा होता हे सांगतानाच तिने बदलत्या स्थितीचा रोख रिया चक्रवर्तीवर ढकलला होता. सुशांत प्रकरणाचा छडा लावण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं गेंल. त्यानतर त्यात ईडी सहभागी झाली. आणि त्यात अंमली पदार्थाचा संदर्भ आल्यानंतर एनसीबीही यात सहभागी झाली. या सगळ्याांनी तपास करायला सुरुवात केली. पण अद्याप सीबीआय कोणत्याही निष्कर्षावर आलेली नाही. सीबीआय लवकरच काय तो सोक्षमोक्ष लावेल अशी आशा सुशांतच्या चाहत्यांना वाटते.