29 वर्षीय अभिनेत्याचा 53 वर्षीय तब्बूसोबत किसिंग सीन, नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज तुफान चर्चेत
Tabu kissing scene : बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ही 53 वर्षांची असून तिने नेटफ्लिक्सवरील एका वेबसिरीजमध्ये 29 वर्षीय अभिनेत्यासोबत किंसिग सीन दिला आहे.

Tabu kissing scene : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्यांच्या गोष्टी आपण ऐकल्या असतील, ज्यांनी पडद्यावर आपल्यापेक्षा खूपच लहान अभिनेत्रींसोबत रोमँटिक आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. अनेकदा असे सीन करताना काही कलाकार नियंत्रण गमावताना देखील दिसले आहेत. विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या अनेक सुपरस्टार्सनी आपल्या वयापेक्षा लहान हिरोइन्ससोबत काम केले आहे. पण तुम्हाला तो अभिनेता माहित आहे का ज्याने आपल्या पेक्षा तब्बल 24 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन देऊन सर्वांचं वेधलं होतं.
आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, तो बॉलिवूडच्या घराण्यातील आहे. त्याची आई, वडील आणि भाऊ हे सर्वजण सिनेसृष्टीतले मोठे कलाकार आहेत. हा अभिनेता म्हणजे ईशान खट्टर. ‘मॅन ऑफ द अवर’, ‘द रॉयल्स’, ‘होमबाउंड’, ‘बीयॉन्ड द क्लाउड्स’ या प्रोजेक्टमुळे ईशान चर्चेत आला. तो फक्त चित्रपटांतच नाही, तर ओटीटीवरही काम करत आहे आणि प्रेक्षक त्याला पसंत करत आहेत.
ईशान आपल्या पहिल्याच वेब सिरीज ‘अ सूटेबल बॉय’मुळे प्रकाशझोतात आला. या सिरीजमध्ये त्याने आपल्या पेक्षा 24 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्री तब्बूसोबत इंटीमेट आणि बोल्ड सीन केले. वयाचा मोठा फरक असूनही दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी खूपच आवडली.























