एक्स्प्लोर

Nach Punajaban Song :  पाकिस्तानी गायकाचा करण जोहरवर गाणं चोरल्याचा आरोप; टी-सीरिजचं सडेतोड उत्तर

एका पाकिस्तानी गायकानं करण जोहरवर नाच पंजाबन हे गाणं चोरल्याचा आरोप केला आहे.

Nach Punajaban Song :  दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) जुग जुग जियो (Jug Jug Jiyo) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निर्मीती करणच्या धर्मा प्रोडक्शन या कंपनीनं केली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ट्रेलरमध्ये नाच पंजाबन या गाण्याची झलक दिसत आहे. आता एका पाकिस्तानी गायकानं करण जोहरवर नाच पंजाबन हे गाणं चोरल्याचा आरोप केला आहे. या पाकिस्तानी गायकाचं नाव अबरार उल हक (Abrar-ul-Haq) असं आहे. या गायकानं केलेल्या आरोपावर टी सीरिज या कंपनीनं उत्तर दिलं आहे. 

गायकाचा आरोप 
अबरारनं ट्वीट शेअर करुन करण जोहरच्या कंपनीवर म्हणजेच धर्मा प्रोडक्शनवर असा आरोप केला आहे की, हे गाणं कॉपी करण्यात आलं आहे. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी माझं नाच पंजाबन हे गाणं कोणत्याही हिंदी भाषेतील चित्रपटाला विकलेलं नाही. मी या चित्रपटाचे राइट्स रिजर्व्ह ठेवले आहेत. करण जोहर सारख्या निर्मात्यानं कॉपी करु नये. हे माझे 6 वे कॉपी केलेले गाणे आहे. याची मी परवानगी दिलेली नाही. या गाणाचे लायसेन्स कोणालाही दिलेलं नाही. जर कोणी या गोष्टीचा दावा करत असेल तर त्यांनी मला करार दाखवणे गरजेचे आहे. मी यावर कायदेशीर कारवाई घेऊ शकतो. '

टी सीरिजचं उत्तर 
अबरारनं केलेल्या आरोपांवर टी-सीरिजनं एक ट्वीट शेअर करुन उत्तर दिलं आहे. टी-सीरिजनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'नाच पंजाबन या अल्बममधील नाच पंजाबन' या गाण्याचे राइट्स आम्ही खरेदी केले आहेत. हे गाणं 1 जानेवारी 2002 रोजी iTunes वर रिलीझ झाले होते, ते लॉलीवुड क्लासिक्सवर देखील उपलब्ध होते. ज्याचे संचालन Meewoo Box Records द्वारे केले जाते. बाकी सर्व क्रेडिट्स हे गाणे रिलीज झाल्यावर दिले जातील.'

जुग जुग जियो या चित्रपटामध्ये कियारा आडवाणी आणि वरुण धवन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळेSupriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
Embed widget