Swara Bhasker : 'आपण मत का देतो? निवडणुकांऐवजी पाच वर्षांनी बंपर सेल घ्या'; महाराष्ट्रातील राजकारणावर स्वरा भास्करचं ट्वीट
Swara Bhasker : स्वरानं एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमधून तिनं महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर टीका केली आहे.

Swara Bhasker : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. कधी स्वरा बॉलिवूडवर निशाणा साधते तर कधी राजकीय घडामोडींवर मतं व्यक्त करते. स्वराच्या सोशल मीडियावर पोस्ट या नेहमी चर्चेत असतात. शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 21 जूनपासून पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. या घडामोडींबाबत अनेक जण वेगवेगळी मत व्यक्त करत आहेत. याबाबतच स्वरानं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमधून तिनं महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर टीका केली आहे.
स्वराचं ट्वीट
स्वरानं शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'हे काय सुरु आहे? आपण मत का देतो? निवडणुकांपेक्षा पाच वर्षांचा 'बंपर सेल' घ्या.' या ट्वीटमध्ये स्वरानं MaharashtraPoliticalTurmoil या हॅशटॅगचा वापर केला आहे. स्वराच्या ट्वीटला 11 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी लाइक केलं आहे. तर अनेकांनी स्वराचं हे ट्वीट रिट्वीट केलं आहे. काहींनी कमेंट करुन स्वराच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे.
What an unrelenting s**tshow! Hum vote detey hi kyun Hain.. Elections ki jagah ‘Bumper Sale’ lagaa doh har 5 saal.. #MaharashtraPoliticalTurmoil
— Swara Bhasker (@ReallySwara) June 22, 2022
दिव्या दत्ता आणि शबाना आझमी यांच्या शीर कोरमा या चित्रपटामध्ये स्वरानं महत्त्वाची भूमिका साकारली. स्वरा सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या नव्या प्रोजेक्ट्सची माहिती देत असते. 'जहा चार यार' हा स्वराचा आगमी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये स्वरासोबत मेहर विज, शिखा तसलानिया आणि पूजा चोप्रा या अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे कथानक हे चार मैत्रीणींच्या आयुष्यावर आधारित आहे. विरे दी वेडींग, गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. स्वराच्या आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात.
हेही वाचा:























