Swapnil Joshi, Bhau Kadam in Premachi Goshta 2 Movie: स्वप्निल जोशी, भाऊ कदम पहिल्यांदाच एकत्र; प्रेक्षकांची दिवाळी दणक्यात, 'प्रेमाची गोष्ट 2'मधून नवी केमिस्ट्री उलगडणार
Swapnil Joshi, Bhau Kadam in Premachi Goshta 2 Movie: चित्रपटात स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम देवाची भूमिका साकारत आहेत. यापूर्वी स्वप्निलने श्रीकृष्णाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. आता 'प्रेमाची गोष्ट 2'मधून तो पुन्हा एकदा देवाच्या रूपात पाहायला मिळणार आहे.

Swapnil Joshi, Bhau Kadam in Premachi Goshta 2 Movie: दिवाळीच्या (Diwali 2025) उत्साहात अधिक रंग भरायला सज्ज झालेला चित्रपट म्हणजे, 'प्रेमाची गोष्ट 2' (Premachi Goshta 2). लव्हस्टोरींचे बादशहा दिग्दर्शक सतीश राजवाडे, दमदार तरुण कलाकार, नेत्रदीपक व्हीएफएक्स आणि रोमँसचा नवा अंदाज या सगळ्यामुळेच सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. त्यातच गौतमी पाटील हिचं थिरकायला लावणारं ठसकेबाज नृत्य या चित्रपटाचं आणखी एक आकर्षण ठरतंय.
हे सगळं खास असतानाच या चित्रपटातील आणखी एक खासियत म्हणजे स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) आणि भाऊ कदम (Bhau Kadam) ही जोडी, पहिल्यांदाच हे दोघे एका वेगळ्या कथानकात आणि अनोख्या भूमिकांमध्ये एकत्र झळकणार आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांच्या ऑनस्क्रीन ट्युनिंगची झलक मिळते. दोघांची उपस्थिती चित्रपटाला एक वेगळी ऊर्जा आणि रंगत देते. त्यामुळे या जोडीकडून प्रेक्षकांना एक ताजेपणाचा अनुभव मिळणार, हे नक्की.
View this post on Instagram
चित्रपटात स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम देवाची भूमिका साकारत आहेत. यापूर्वी स्वप्निलने श्रीकृष्णाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. आता 'प्रेमाची गोष्ट 2'मधून तो पुन्हा एकदा देवाच्या रूपात, नव्या शैलीत आणि भाऊ कदमसोबतच्या हटके केमिस्ट्रीमधून प्रेक्षकांसमोर येतोय. सतीश राजवाडे यांचं जादुई दिग्दर्शन, रोमँटिक कहाणीची जादू आणि या जोडीची खास उपस्थिती, हे सगळं मिळून 'प्रेमाची गोष्ट 2' प्रेक्षकांसाठी दिवाळीतील सर्वात सुंदर सिनेमॅटिक गिफ्ट ठरणार आहे.
एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे निर्माते संजय छाब्रिया आणि सह-निर्माते अमित भानुशाली यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'प्रेम आणि नशिबाचा हा जादुई प्रवास' प्रेक्षकांना 21 ऑक्टोबर म्हणजेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनुभवायला मिळणार आहे.























