एक्स्प्लोर
Advertisement
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुलगा सूरजला ओढल्याने आदित्य पांचोली नाराज
सूरजवर 8 वर्षांपासून आरोप होताहेत. सोशल मीडियावर त्याला शिव्या दिल्या जात आहेत. जर सूरज अपराधी असेल तर त्याला शिक्षा होईल, जर तो निर्दोष असेल तर कायदा त्याला सोडून देईल, असं आदित्य पांचोलीनं म्हटलं आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्या प्रकरणात सूरज पांचोलीचं नाव जोडलं जात असल्यानं त्याचे वडील अभिनेता आदित्य पांचोलीनं आक्षेप घेतला असून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना आदित्य पांचोली म्हणाला की, "लोकं आपल्या मनाच्या काहीही गोष्टी सांगतात आणि खोट्या कहाण्या सांगतात. असं करणारे थोडाही विचार करत नाहीत की, दोन मिनिटांच्या फेमसाठी ते एखाद्या व्यक्तिवर किती दबाब तयार करत आहेत. लोकांना या गोष्टींची कल्पना नाही की, यामुळं सूरजला मानसिक आणि भावनिक किती त्रास सोसावा लागत आहे.
लोक 8 वर्षांपासून (जिया खान आत्महत्या प्रकरण) नॉनस्टॉप बोलत आहेत. कुणी त्याला रेपिस्ट म्हणतं तर कुणी त्याला हत्यारा म्हणतं. आता सुशांत आणि दिशा प्रकरणात देखील त्याचं नाव जोडलं जात आहे. अशाने माणूस तुटून जातो, असं आदित्य पांचोली म्हणाला.
आदित्य पांचोली म्हणाला की, लोकं आजकाल सोशल मीडियावर काहीही लिहितात आणि जगात तो ट्रेंड होतो. मात्र असं करणारे आणि या गोष्टी मानणारे लोक सत्य काय आहे, याबाबत आजिबात माहिती करुन घेत नाहीत. तो म्हणाला की, पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहे. अशात सूरजवर लावल्या जाणाऱ्या गंभीर आरोपांची पोलिसांना माहितीही नाही? असं कसं होऊ शकतं? मी तर म्हणतो की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून व्हावी. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तसंच सुशांतच्या परिवाराला देखील समाधान मिळेल, असं आदित्य पांचोली म्हणाला.
आदित्यनं सांगितलं की, सूरजवर जिया खान आत्महत्या प्रकरणात खूप दबाव आहे. अशात सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणी त्याच्यावर केले जात असलेल्या आरोपांनी तो खूप विचलित झाला आहे. आम्ही त्याला कामावर लक्ष देण्याबाबत सांगत आहोत. सूरजवर 8 वर्षांपासून आरोप होताहेत. सोशल मीडियावर त्याला शिव्या दिल्या जात आहेत. जर सूरज अपराधी असेल तर त्याला शिक्षा होईल, जर तो निर्दोष असेल तर कायदा त्याला सोडून देईल, असं आदित्य म्हणाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement