OTT Suspense Thriller Webseries: 6 एपिसोड्सची जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर वेबसीरिज एकदा पहाच; विक्षिप्त डिटेक्टिव्ह, गुंतागुंतीच्या केसेस; शेवटपर्यंत खिळवणारा थरार
विशेष म्हणजे, रहस्य उलगडण्याची पद्धत आणि मुख्य व्यक्तिरेखांची केमिस्ट्री या सीरिजला आणखी रंजक बनवते.

OTT suspense thriller webseries: OTTवर क्राईम, मर्डर मिस्ट्री आणि डिटेक्टिव्ह कथा पाहण्याची आवड असेल, तर तुमच्यासाठी आज एक जबरदस्त सिरीज (Suspense Thriller) घेऊन आम्ही आलो आहोत. अवघ्या 6 एपिसोडच्या या सिरीजमध्ये गुन्ह्यांची गुंतागुंतीची प्रकरणं, तपास आणि ट्विस्ट आणि सस्पेन्स प्रेक्षकाला खिळवून ठेवतो. कथा कुठेही अनावश्यकपणे रेंगाळत नाही. त्यामुळे पहिला एपिसोड सुरू केल्यानंतर पुढे नेमकं काय होणार, याची उत्सुकता शेवटपर्यंत कायम राहते. विशेष म्हणजे, रहस्य उलगडण्याची पद्धत आणि मुख्य व्यक्तिरेखांची केमिस्ट्री या सीरिजला आणखी रंजक बनवते.( Webseries)
कोणती वेबसीरिज आहे?
के.के. मेनन आणि रणवीर शौरी स्टारर ‘शेखर होम’ ही क्राईम-ड्रामा सीरिज 2024 मध्ये प्रदर्शित झाली होती. आर्थर कॉनन डॉयल यांच्या प्रसिद्ध ‘शेरलॉक होम्स’ कथांपासून प्रेरित असलेली ही सीरिज सृजित मुखर्जी आणि रोहन सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेली आहे. ही सिरीज सस्पेन्स, ह्युमर आणि भावनिक कथानक यांचा सुरेख मेळ साधण्यात यशस्वी झाली आहे.
काय आहे कथानक?
‘शेखर होम’ची कथा 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील बंगालमधील लोनपूर या शांत शहरात घडते. इथे भेटतो एक अत्यंत हुशार, पण तितकाच विक्षिप्त डिटेक्टिव्ह शेखर होम. शेखरच्या आयुष्यात जयव्रत सैनीची एन्ट्री होते. सुरुवातीला दोघांचं नातं फारसं जुळत नाही. पण परिस्थिती अशी काही वळणं घेते की हीच जोडी पुढे एकत्र येते आणि अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू करते.
या सीरिजची खासियत म्हणजे ती ‘शेरलॉक होम्स’च्या कथांपासून प्रेरित असली, तरी तिची मांडणी पूर्णपणे भारतीय वातावरणात करण्यात आली आहे. त्यामुळे बंगालची पार्श्वभूमी, 90च्या दशकातील वातावरण आणि रहस्यमय गुन्ह्यांचा तपास यांचा वेगळाच अनुभव मिळतो.
शेखर होमच्या तल्लख निरीक्षणशक्ती आणि अफलातून तर्कशक्तीमुळे प्रत्येक प्रकरणात नवं रहस्य उलगडत जातं. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार, याची उत्सुकता कायम राहते.
के.के. मेननचा दमदार अभिनय
या सीरिजचा सर्वात मोठा प्लस पॉइंट म्हणजे के.के. मेनन यांची भूमिका. त्यांनी शेखर होमची व्यक्तिरेखा आपल्या खास अंदाजात साकारली आहे. त्यांच्या अभिनयाला रणवीर शौरीच्या व्यक्तिरेखेची उत्तम साथ मिळते. रासिका दुग्गल आणि कीर्ती कुल्हारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘शेखर होम’मध्ये एकूण 6 एपिसोड आहेत आणि प्रत्येक एपिसोड साधारण 39 ते 47 मिनिटांचा आहे.
कुठे पाहता येईल?
‘शेखर होम’चा प्रीमियर 14 ऑगस्ट 2024 रोजी JioCinema वर झाला होता. क्राईम, डिटेक्टिव्ह आणि मर्डर मिस्ट्रीचा थरार आवडत असेल, तर के.के. मेननचा ‘शेखर होम’ तुमच्या OTT वॉचलिस्टममध्ये नक्की असायला हवा.





















