एक्स्प्लोर

'आमच्या नात्यात तिसरी व्यक्ती..' मौनी रॉयशी घटस्फोट घेताच सूरज नांबियारनं मौन सोडलं; म्हणाला..

या सगळ्या चर्चांमध्ये मात्र आता सूरजने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

Mauni Roy Suraj Nambiar: अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सुरज नांबीयार वेगळे झाल्याची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. लग्नाच्या चार वर्षानंतर घटस्फोट घेतल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. मौनीने सूरजकडे मोठी पोटगी मागितल्याचा दावा करण्यात आला. सुरज आणि मौनी यांचं नातं तुटण्याचं कारण कोणी तिसरी व्यक्ती आहे असेही बोललं गेलं. या सगळ्या चर्चांमध्ये मात्र आता सूरजने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

सुरज नांबीयारनं सगळ्या प्रकारावर मौन सोडलं ..

सूरजने इन्स्टाग्रामवर लिहिले, “मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, कोणतीही पोटगी मागण्यात आलेली नाही. आमच्यात कोणताही वाद नाही आणि आमच्या नात्यात कोणतीही तिसरी व्यक्ती आलेली नाही. मौनी आणि मी परस्परांच्या भल्याचा विचार करून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. हाच एकमेव सत्य आहे. याशिवाय जे काही बोललं जात आहे, ते फक्त आमची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे.”

पुढे त्याने लिहिले, “मी पुन्हा सांगतो, आमच्या दोघांबद्दल किंवा कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीबद्दल केलेल्या दाव्यांमध्ये अजिबात तथ्य नाही. या प्रकरणात निरपराध मित्रांनाही ओढलं जात आहे, जे पूर्णपणे चुकीचं आहे. या संपूर्ण काळात मौनी आणि मी आमचा सन्मान कायम ठेवला आहे आणि माध्यमांनीही बातम्या देताना त्याच संवेदनशीलतेने वागावं, अशी अपेक्षा आहे.”


आमच्या नात्यात तिसरी व्यक्ती..' मौनी रॉयशी घटस्फोट घेताच सूरज नांबियारनं मौन सोडलं; म्हणाला..

आम्हाला शांततेत जगू द्या..

माध्यमांवर नाराजी व्यक्त करत सूरज म्हणाला, “काही मीडिया हाऊसेसनी कोणताही पुरावा नसताना काल्पनिक कथा तयार केल्या. तथ्य पडताळणी न करता अशा बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत. मुद्दाम पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीवर शांत बसणं मला मान्य नाही. आम्ही आमच्या निवेदनात आवश्यक ते सर्व सांगितले आहे. कृपया अफवा पसरवू नका आणि आम्हाला शांततेत जगू द्या.”

विभक्त होण्याची घोषणा

यापूर्वी 14 मे रोजी मौनी आणि सूरज यांनी संयुक्त निवेदन जारी करत विभक्त होण्याची घोषणा केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, “आमच्या खासगी आयुष्यात होणाऱ्या अनावश्यक हस्तक्षेपामुळे आम्ही दुखावलो आहोत. आम्ही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून हे प्रकरण सन्मानपूर्वक हाताळण्यासाठी वेळ घेत आहोत.”

मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांची पहिली भेट 2018 मध्ये दुबईमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान झाली होती. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी जानेवारी 2022 मध्ये लग्न केले होते. मात्र लग्नाच्या चार वर्षांनंतर आता त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित वृत्त:

Mauni Roy Disha Patni Relationship: चार वर्षांचा संसार मोडला; मौनी रॉय दिशा पाटनीसोबत रिलेशनशिपमध्ये? व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget