एक्स्प्लोर

Suraj Chavan Bungalow House Photo Viral: सूरज चव्हाणचं नवं घर पाहिलंत का, 'अलिशान', 'लॅव्हिश' शब्दही फिके पडतील असा थाट, हा VIDEO पाहिलात का?

Suraj Chavan Bungalow House Photo Viral: बिग बॉस फेम सूरज चव्हाणच्या घराचा आलिशान थाट, घराची झलक पाहून तुमचे डोळे दिपतील...

Suraj Chavan Bungalow House Photo Viral: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता आणि अवघ्या महाराष्ट्राचा (Maharashtra News) गुलिगत स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या चर्चेत आहे. सूरज चव्हाणची सध्या लगीनघाई सुरू आहे. नुकतेच त्याच्या लग्नाच्या शॉपिंगचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता सूरज चव्हाणनं आणखी एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. सूरज चव्हाणचं स्वप्न पूर्ण झालं आहे. सूरज चव्हाणचं बारामतीत मोठ्ठं घर बांधून पूर्णपणे तयार झालं असून नुकतीच त्याच्या घराची वास्तुशांती पार पडली. सूरजनं स्वतः यासंदर्भात माहिती दिली असून व्हिडीओमधून त्यानं त्याच्या नव्याकोऱ्या आलिशान घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

बिग बॉस जिंकल्यानंतर सूरजनं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. तेव्हाच त्यांनी सूरजला घर बांधून देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सूरज चव्हाणच्या घराचा पाया खणण्यात आला आणि घराचं बांधकाम सुरू झालं. त्यानंतर अजित पवारांनी सूरज चव्हाणच्या घराची वेळोवेळी चौकशी करत पाहणी देखील केली होती. अशातच आता सूरज चव्हाणचं आलिशान घर बांधून पूर्ण तयार झालं असून त्याची वास्तुशांतीही पार पडली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

सूरजच्या घराचा लूक कसा? 

सूरज चव्हाणचं दुमजली घर फारच प्रशस्त आणि मोठ्ठं आहे. आतमध्ये अगदी मोठमोठ्या खिडक्या, त्यांना चकचकीत काचा आहेत. तर, फ्लोरिंग, किचन सगळं सगळं अगदी हायटेक आणि अद्ययावर टेक्नॉलॉजीनं परिपूर्ण आहे. तर, हाय सीलिंगमुळे अलिशान असा लूक घराला आला आहे. घराबाहेर मोठ्ठं अंगण, घराच्या आतमध्ये येताच मोठ्ठा हॉल आहे. त्यालाच लागून मोठ्ठं किचन आहे. तर, दुसऱ्या मजल्यावर काही खोल्या आहेत. सूरज चव्हाणचं घर खूपच सुंदर दिसतंय. 

सूरजच्या घरी लगीनघाई

सूरज चव्हाणनं काही दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट घेत त्यांना नव्या घराच्या पूजेचं आणि लग्नाचंही आमंत्रण दिलेलं. सूरज चव्हाणच्या लग्नाला अजित पवार हजेरी लावणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. सूरज चव्हाणच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. येत्या 29 नोव्हेंबरला सूरज चव्हाण लग्नबंधनात अडकणार आहे. सूरज त्याच्या मामाची मुलीसोबत लग्न करतोय. 

दरम्यान, सूरजची परिस्थिती तशी बेताचीच होती. लहानपणीच आई-वडिलांचं छत्र हरवलेला सूरज चव्हाण त्याच्या बहि‍णींकडे लहानाचा मोठा झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोठा झालेल्या सूरजनं सोशल मीडियाचा आधार घेतला आणि आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे तो प्रसिद्ध झाला. पण, तिथेही त्याची काही लोकांनी फसवणूक केली. पण, सूरजचं नशीब खऱ्या अर्थानं पालटलं ते, बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर. संपूर्ण महाराष्ट्रानं सूरज चव्हाणला भरभरून प्रेम दिलं आणि सूरज चव्हाणनं थेट विजेतेपद पटकावलं. आता सूरजला आपलं हक्काचं घर मिळालं आहे. तसेच, नव्या घरात आपल्या होणाऱ्या बायकोसोबत लवकरच सूरज चव्हाण आपला संसार थाटणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Suraj Chavan Wedding: अरेंज वैगरे न्हाय, भावाचं लव्ह मॅरेज हाय; गुलिगत स्टार सूरज चव्हाण मामाच्या मुलीसोबत बोहल्यावर चढणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीला घरापासून दूर नेलं; अत्याचार केला अन् संपवलं, संतापजनक घटनेनंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद
Embed widget