Rajinikanth : रजनीकांत ठरले 'हायेस्ट टॅक्स पेयर'; तमिळनाडू इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून सन्मान, ऐश्वर्याकडून पोस्ट शेअर
रजनीकांत (Rajinikanth) यांना रेग्युलर आणि हायेस्ट टॅक्स पेयर म्हणून सन्मानित करण्यात आलं.
![Rajinikanth : रजनीकांत ठरले 'हायेस्ट टॅक्स पेयर'; तमिळनाडू इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून सन्मान, ऐश्वर्याकडून पोस्ट शेअर superstar rajinikanth honoured by income tax department aishwaryaa rajinikanth shares post Rajinikanth : रजनीकांत ठरले 'हायेस्ट टॅक्स पेयर'; तमिळनाडू इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून सन्मान, ऐश्वर्याकडून पोस्ट शेअर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/86e7304bdd8cb81680dd560d902b99851658725210_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Rajinikanth : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) त्यांच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. रविवारी (24 जुलै) देशामध्ये इनकम टॅक्स-डे साजरा करण्यात आला. यावेळी चित्रपटसृष्टीचे थलाइवा म्हणजेच रजनीकांत यांना रेग्युलर टॅक्स पेयर आणि हायेस्ट टॅक्स पेयर म्हणून सन्मानित केलं. नुकतीच रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांतनं एक खास पोस्ट केली. या पोस्टमध्ये ऐश्वर्या ही रजनीकांत यांच्यावतीनं सन्मात स्विकारताना दिसत आहे.
तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांच्या हस्ते रजनीकांत यांचा गौरव करण्यात आला. रजनीकांत यांच्यावतीनं ऐश्वर्यानं हा सन्मान स्विकारला. ऐश्वर्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'सर्वाधिक आणि वेळेत टॅक्स भरणाऱ्या रजनीकांत यांची मी मुलगी आहे, या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. इनकम टॅक्स-डेनिमित्त मी तमिळनाडू आणि पाँडीचेरी टॅक्स डिपार्टमेंट यांनी माझ्या आप्पांचा सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.' ऐश्वर्याच्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा पोस्ट:
View this post on Instagram
1975 मध्ये रजनीकांत यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटामधील रजनीकांत यांच्या स्टाईलला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. 2007 मध्ये रिलीज झालेल्या 'शिवाजी' या चित्रपटानं भारताबरोबरच यूके आणि साऊथ अफ्रीकामधील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्या चित्रपटासाठी रजनीकांत यांनी 26 कोटींचे मानधन घेते होते. त्यानंतर रजनीकांत यांनी 'रोबोट' या चित्रपटासाठी 30 कोटी मानधन घेतले.
2019 मध्ये रिलीज झालेल्या petta या चित्रपटासाठी त्यांनी 65 कोटी रुपये फी घेतली. त्यांचे 2.0, Annaatthe या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. जेलर हा रजनीकांत यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रिपोर्टनुसार त्यांनी या चित्रपटासाठी 150 कोटी मानधन घेतलं आहे.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)