एक्स्प्लोर

नात्यातील टक्कर, विनोदाची धमाल... उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी, या चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांसाठी ही खास मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.

Marathi film poster out: झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ या बहुचर्चित मल्टिस्टारर आणि कौटुंबिक महासोहळ्याच्या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले असून सोशल मीडियावर त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रेक्षकांसाठी ही खास मनोरंजनाची मेजवानी ठरणार असून, भव्यदिव्य स्टारकास्ट असलेला हा कौटुंबिक चित्रपट मोठ्या पडद्यावर धमाल उडवण्यासाठी सज्ज झाला आहे.

चित्रपटाच्या पोस्टरने वाढवली उत्सुकता

एका घराच्या दारात रंगलेला गोंधळ, एका बाजूला पारंपरिक कुटुंब तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांचे प्रतिनिधित्व करणारी तरुण जोडी अशा भन्नाट आणि विनोदी प्रसंगाची झलक पोस्टरमधून पाहायला मिळते. पोस्टरमधील प्रत्येक पात्राची देहबोली आणि हावभाव कथेतला संघर्ष, नात्यांतील टक्कर आणि विनोदाची धमाल याची उत्सुकता वाढवतात.

एका बाजूला पारंपरिक विचारांचे प्रतिनिधित्व करणारे कुटुंब दार उघडण्याच्या तयारीत दिसते, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक तरुणाई दार बंद करण्याचा प्रयत्न करताना दिसते. या दाराच्या दोन्ही बाजूंना उभा असलेला संघर्ष म्हणजेच कथानकाचा गाभा असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा चित्रपट विनोदी असला तरी भावनिक अंगानेही तितकाच मजबूत असेल, याची झलक हे पोस्टर देते.

दमदार स्टारकास्टने वेढले लक्ष 

झी स्टुडिओजची प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स, सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित आणि समीर आशा पाटील दिग्दर्शित या चित्रपटात निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. एवढ्या भल्या मोठ्या स्टारकास्टमुळे ‘सुपर डुपर’ हा खऱ्या अर्थाने मल्टिस्टारर ठरणार आहे. प्रत्येक कलाकाराची वेगळी शैली आणि विनोदी टाइमिंग या चित्रपटाला अधिक रंगतदार बनवणार, यात शंका नाही.

पोस्टरमधून दिसते चित्रपटाच्या स्वभावाची झलक

दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, “हे पोस्टर म्हणजे चित्रपटाच्या स्वभावाची पहिली झलक आहे. एका घरातल्या दोन विचारसरणींची मजेशीर टक्कर यातून दिसते. आपण एका कुटुंबाची फिल्म कुटुंबासाठी घेऊन येत आहोत. नात्यांमधला गोंधळ, प्रेम, राग, आपुलकी आणि भावनिक क्षण यांचा सुरेख संगम ‘सुपर डुपर’मध्ये पाहायला मिळेल. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला स्वतःचं प्रतिबिंब या कथेत दिसेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. पोस्टरमुळेच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून ३ एप्रिलला रंगणारा हा कौटुंबिक महासोहळा प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Toxic Yash Animal Scene: यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग
यशने रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मधील 'तो' सीन केला कॉपी? ‘टॉक्सिक’मधील न्यूड लूकवर होतंय ट्रोलिंग

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget