Sunny Deol : सनी देओलच्या हाती कोट्यवधींच्या गाडीचं स्टेअरिंग; नव्या गाडीची किंमत माहितीये?
नुकतीच सनीनं लँड रोवर डिफँडर 110 ही गाडी घेतली आहे.

Sunny Deol : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओल (Sunny Deol) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. सनीला वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन करायला आवडते. नुकतीच त्यानं लँड रोवर डिफँडर 110 ही गाडी घेतली आहे. सनीने या 5-डोरच्या एसयूव्हीचे V8 टॉप मॉडेल खरेदी केले आहे. या गाडीची किंमत 2.05 कोटी रुपये आहे.
भारतातील मार्केटमध्ये लँड रोव्हर डिफँडर 110 चे दोन व्हेरियंट विकले जातात. त्यामधील एक प्रकार हा तीन दारांचा 90 व्हेरियंट आहे तर दुसरा हा पाच दारांचा 110 व्हेरियंट आहे. सनी देओलने विकत घेतलेल्या व्हेरियंटमध्ये 5.0-लिटर V8 इंजिन आहे जे 518 bhp पॉवर आणि 625 Nm पीक टॉर्क बनवते. कंपनीने या SUV सोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम दिली आहे. या गाडीचा टॉप स्पीड 240 किमी / तास आहे.
सनीकडे आहे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन
सनी देओलसोबतच त्याच्या वडिलांना म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र यांना देखील रेंज रोव्हर ही गाडी आवडते. सनी देओलकडे लँड रोव्हर आणि रेंज रोव्हर स्पोर्ट आणि फ्रीलँडर 2 या गाड्या आहेत. त्याचबरोबर त्याच्याकडे पॉर्श 911 टर्बो, पॉर्श कायेन, ऑडी ए8, मर्सिडीज-बेंज एसएल500 या गाड्या देखील आहेत.
View this post on Instagram
गदर-2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
सनी देओलचा गदर-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. . या चित्रपटात सकिना ही भूमिका अमिषा पटेल तर तारा सिंग ही भूमिका सनी देओल साकारणार आहेत. गदर -2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केले आहे. गदर या चित्रपट 19 कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकरांची विशेष पसंती मिळाली. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 133 कोटींची कमाई केली. त्यामुळे गदर-2 चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
