सुनील शेट्टींची इमारत सील, पाच कोरोना रुग्ण आढळल्यानं महापालिकेचा निर्णय
अभिनेता सुनील शेट्टी राहत असलेली दक्षिण मुंबईतीस अल्टामाऊंट रोडवरील इमारत सील केली असल्याचं महापालिकेचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितलं आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी राहत असलेली दक्षिण मुंबईतीस अल्टामाऊंट रोडवरील 'पृथ्वी अपार्टमेंट्स' नावाची इमारत सील (Sunil Shetty's building sealed)केली आहे. ते राहत असलेल्या या इमारतीमध्ये कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आल्याने मुंबई महापालिकेनं इमारत सील केली आहे.
महापालिकेचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी एबीपी माझाला सांगितलं की, 'पृथ्वी अपार्टमेंट्स' इमारतीला कोरोनामुळं दोन दिवसांपूर्वी सील केलं आहे. अल्टामाऊंट रोड मुंबईतील सर्वात पॉश परिसरांपैकी एक आहे. रियल इस्टेटच्या दृष्टीनं देखील हा भाग जगातील सर्वात महागड्या परिसरांपैकी एक मानला जातो.
Inside Photos | ....असं आहे सुनील शेट्टीचं खंडाळ्यातील आलिशान हॉलिडे होम
अभिनेते सुनील शेट्टी मागील काही वर्षांपासून कई सालों अल्टामाऊंट रोडवरील 'पृथ्वी अपार्टमेंट्स' मध्ये राहतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी माना शेट्टी, त्यांची मुलगी अथिया शेट्टी आणि लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारा त्यांचा मुलगा अहान शेट्टीही याच इमारतीत राहतात.
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोल्हापूर, सांगली अजूनही हॉटस्पॉट
प्रशांत गायकवाड यांनी सुनील शेट्टी यांच्या परिवारातीला कुठल्याही सदस्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचं सांगितलं आहे. सुनील शेट्टींच्या प्रवक्त्यांनी देखील याला दुजोरा दिला आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रात कुठल्याही इमारतीमध्ये जर पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत असतील तर इमारतीला मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषित करुन इमारत सील केली जाते. पाच पेक्षा कमी कोरोना रुग्ण असणाऱ्या इमारतींमध्ये रुग्ण मिळालेल्या फ्लोअरला सील केले जाते.
मुंबईत गेल्या 24 तासात 558 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये काही दिवसांपासून कोरोनाचा आकडा दैनंदिन सातशेच्या खाली आला आहे. कोरोनाच्या कालच्या आकडेवारीनुसार मुंबईत गेल्या 24 तासात 558 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 15 जणांचा कोरोनाने जीव गेला. मुंबईत आतापर्यंत 15 हजार 627 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. सध्या मुंबईत 11 हजार 423 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत.