प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन
Sudip Pandey Death : अभिनेता सुदीप पांडे याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. सुदीप पांडे भोजपुरी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चेहरा आहे.
Actor Sudip Pandey Passes Away : अभिनेता सुदीप पांडे याचं निधन झालं आहे. सुदीप पांडे भोजपुरी इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. त्याच्या निधनानंतर भोजपुरी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. सुदीप पांडे भोजपुरी अभिनेता आणि निर्माता होता. 15 जानेवारी रोजी सुदीप पांडे याचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. सुदीप पांडेने फारच कमी वयात जगाचा निरोप घेतल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अभिनेता सुदीप पांडेचं निधन
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता सुदीप पांडे अलिकडे चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त होता. यासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक घडामोडी घडत असल्याची माहिती आहे. सुदीपच्या मित्राने एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, सुदीप अनेक अडचणींचा सामना करत होता. त्याच्या आयुष्यातील हा काळ फारच कठीण होती. त्याचं फिल्मी करियर चांगलं चालत नव्हतं. त्याने बनवलेल्या चित्रपटानंतर त्याला मोठं नुकसान भोगावं लागलं. विक्टर चित्रपटामुळे त्याचे पैसे बुडाले. याशिवाय, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही काही अडचणींचा सामना त्याला करावा लागत होता.
View this post on Instagram
ह्रदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू
सुदीप पांडे हा बिहारमधील गया येथील रहिवासी होता. चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी त्याने इंजिनीयरिंगची पदवी मिळवली होती. त्याने अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये कामही केलं होतं. त्यानंतर त्याने अभिनयात हात आजमावला. त्याने भोजपुरी चित्रपटांपासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. याशिवाय त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
Bhojpuri actor Sudip Pandey dies of a heart attack.#Bhojpuri actor and filmmaker #SudipPandey has died in Mumbai at around 11 am due to a heart attack. His career spanned both Bhojpuri and #Hindi cinema.
— Entertainment Feed (@EntFeed_) January 15, 2025
Sudeep was currently working on his upcoming film #ParoPatnaWali. pic.twitter.com/FAy1EWQZIv
अभिनेता सुदीप पांडेची कारकीर्द
सुदीप पांडेने 2007 मध्ये भोजपुरी चित्रपट 'भोजपुरिया भैया' द्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. सुदीप पांडेने अॅक्शन स्टार आणि हार्टथ्रोब म्हणून प्रसिद्धी मिळवली. त्याने प्यार में, बलवा आणि धरती सारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले. 2019 मध्ये, तो 'व्ही फॉर व्हिक्टर' या हिंदी चित्रपटात दिसला. त्याने अलीकडेच 'पारो पटना वाली'च्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू केलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :