एक्स्प्लोर

Subhedar Trailer : प्रदर्शनापूर्वीच 'सुभेदार' चित्रपटाने रचला नवा विक्रम, ट्रेलरला लाखोंची पसंती 

नुकताच 'सुभेदार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर एका दिवसातच त्याने नवा विक्रम नोंदवला आहे.

Subhedar Trailer : दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar)  यांच्या  'सुभेदार' (Subhedar)  या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने  वाट बघत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरला अवघ्या काही तासातच हजारो व्ह्यूज मिळाले आहे. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली असून नेटकऱ्यांनी या ट्रेलरवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  18 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या ट्रेलरने नुकताच एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरचे व्ह्यूज सातत्याने वाढत असून प्रेक्षकांनी चित्रपटाच्या ट्रेलरला चांगलेच उचलून धरले आहे. काही तासांतच या ट्रेलरने कमाल केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)

या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. सुभेदार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये "आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं..." हा डायलॉग ऐकू येतो. सुभेदार चित्रपटाच्या ट्रेलरमधील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तर ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर एका दिवसातच त्याने नवा विक्रम नोंदवला आहे. हा ट्रेलर यू ट्यूबवर 1 नंबरवर ट्रेंड होत असून हा आतापर्यंतच्या सगळ्या मराठी चित्रपटांच्या ट्रेलर्सपैकी सर्वात कमी वेळात सर्वात जास्त पहिला गेलेला ट्रेलर बनला आहे.

'सुभेदार' चित्रपटाची स्टार कास्ट

'सुभेदार' हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. तर चिन्मय मांडलेकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. ‘सुभेदार’ या आगामी चित्रपटात मृणाल कुलकर्णी जिजाऊ आईसाहेबांच्या, विराजस जीवाच्या भूमिकेत पहायला मिळणार असून यशोदाबाई मालुसरेच्या भूमिकेत शिवानी रांगोळे दिसणार आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड  या चित्रपटांमधील अजय पुरकर  यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता अजय पुरकर  यांच्या 'सुभेदार' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

'सुभेदार' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Subhedar Released Date)

'सुभेदार' या सिनेमात प्रेक्षकांना तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा दिग्पाल लांजेकरने सांभाळली आहे. हा सिनेमा 18 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Priya Bapat: 'रंगभूमीवर पुनरागमन करण्याचा माझा निर्णय...'; प्रिया बापटनं शेअर केलेल्या व्हिडीओनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget