एक्स्प्लोर

एक भेट अशी जी कायम स्मरणात राहिल! टीव्ही कलाकारांनी घेतली पडद्यामागच्या कलाकारांची भेट

Marathi Serial : ‘आई कुठे काय करते’, ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘फुलाला सुगंध मातीचा’ आणि ‘मुरांबा’ मालिकेतील कलाकारांनी नुकतीच सेटवरील तंत्रज्ञांच्या परिवाराची भेट घेतली.

Marathi Serial : परिवार असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. जेव्हा, सारे एकत्र येतात तेव्हा सोहळा होतो आनंदाचा, आपुलकीचा आणि कौतुकाचा. स्टार प्रवाहवरील मालिकांमधली प्रत्येक पात्र आपल्या परिवाराचा महत्त्वाचा भाग आहे. प्रेक्षक घरबसल्या मालिकेच्या माध्यमातून आपल्या आवडत्या कलाकारांना भेटत असतात. स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने संपूर्ण प्रवाह परिवार एकत्र येणार आहे.

दर्जेदार कार्यक्रमांचा हा डोलारा उभा करण्यात कलाकार आणि दिग्दर्शकांसोबतच तंत्रज्ञांचाही मोलाचा वाटा असतो. या मंडळींशिवाय प्रवाह कुटुंब पूर्ण होऊच शकत नाही. कलाकारांना घरोघरी पोहचवणारी ही मंडळी मात्र पडद्यामागे राहून सूत्र हलवत असतात. याच सदस्यांना स्टार प्रवाहच्या कलाकारांनी एक खास सरप्राईज दिलं. स्टार प्रवाहच्या कलाकारांची स्वारी मालिका घडवण्यात दिवसरात्र राबणाऱ्या या तंत्रज्ञांच्या घरी पोहोचली.

लाडक्या कलाकारांची भेट ठरली अविस्मरणीय!

एक दिवस शूटिंगला ब्रेक देत स्टार प्रवाहच्या कलाकारांनी हा दुग्धशर्करा योग जुळवून आणला. दैनंदिन मालिका साकारण्यासाठी कलाकार आणि दिग्दर्शकांबरोबरच मोलाचं योगदान देणाऱ्या सेटवरील तंत्रज्ञांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन कलाकारांनी त्यांच्या परिवाराची भेट घेतली. पाहुणे येती घरा तोचि दिवाळी दसरा ही म्हण प्रचलित आहेच. मात्र आम्हीही तुमच्या परिवाराचा एक भाग आहोत, ही भावनाच सुखावणारी होती. आपल्या परिवाराचं प्रेम नेमकं काय असतं हे त्यादिवशी आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, सुख म्हणजे नक्की काय असतं, फुलाला सुगंध मातीचा आणि मुरांबा मालिकेतील कलाकारांनी अनुभवलं. तर, तंत्रज्ञांच्या कुटुंबासाठीही आपल्या लाडक्या कलाकारांची ही भेट अविस्मरणीय ठरली.

कलाकारही भारावले!

यावेळी मनसोक्त गप्पा तर रंगल्याच, मात्र थोरामोठ्यांना नमस्कार करताना जयदीप ही व्यक्तिरेखा साकारणारा मंदार जाधव, गौरी म्हणजेच गिरिजा प्रभू आणि मुरांबा मालिकेतील अक्षय म्हणजेच अभिनेता शशांक केतकर, शिवानी मुंढेकर भावूक झाले होते. तर, आई कुठे काय करते मालिकेतील संजना,अनिरुद्ध आणि रंग माझा वेगळा मालिकेतील सौंदर्या इनामदारही या खास भेटीने भारावून गेल्या होत्या. स्टार प्रवाह वाहिनी वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असते. या आगळ्या वेगळ्या भेटीने नात्यातला गोडवा वाढला असणार हे नक्कीच!

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?सरकारमध्ये सामील व्हावं,आमदारांचा आग्रहTop 70 News : सकाळी 7  च्या 70 महत्वाच्या बातम्यांचा आढावा : 05 DEC 2024 : ABP MajhaSpecial Report Eknath Shinde : दिल्लीतला फोटो  ते राजभवन, चर्चा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याची ABP MajhaZero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार की नाही? महायुतीचा बडा नेता 15 लाखांचं उदाहरण देत म्हणाला...
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Nana Patole: शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
शपथविधीपूर्वी नाना पटोलेंकडून अचानक आमदारकीचा राजीनामा द्यायची भाषा, नेमकं काय घडलं?
Mahayuti Oath Taking Ceremony: पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला फक्त 20 मिनिटांसाठीच येणार? आझाद मैदानावर नेमके कितीजण शपथ घेणार?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Embed widget