Ram Charan : राम चरणने पूर्ण केली कॅन्सरग्रस्त मुलाची इच्छा, छोट्या चाहत्यासोबतचे फोटो व्हायरल
Ram Charan : अभिनेता राम चरण याने नऊ वर्षांच्या लहान मुलाची इच्छा पूर्ण केली आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या या बालकाची राम चरण याला भेटण्याची इच्छा होती. त्याची ही इच्छा राम चरण याने पूर्ण केली.
Ram Charan : अभिनेता राम चरणला साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा गोल्डन बॉय म्हटले जाते. त्याने एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर या चित्रपटाद्वारे त्याच्या स्टारडमला आणखी उंचीवर नेले आहे. चित्रपटांमधील चमकदार अभिनयासोबतच तो त्याच्या नम्र स्वभावासाठीही ओळखला जातो. पुन्हा एकदा त्याने आपल्या कामाने सोशल मीडियावर लोकांची मने जिंकली आहेत.
अलीकडेच राम चरण याने औदार्य दाखवून नऊ वर्षांच्या लहान मुलाची इच्छा पूर्ण केली आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या या बालकाचे नाव रवुला मणि कुशल असून त्याच्यावर स्पर्श रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलाने रामचरणला भेटून त्याच्यासोबत काही वेळ घालवण्याची इच्छा व्यक्त केली होती. रुग्णालयाच्या संचालिका नंदिनी रेड्डी यांनी मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. रेड्डी यांच्या प्रयत्नामुळे सुपरस्टार राम चरण याला भेटण्याची मुलाची इच्छा पूर्ण झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये राम चरण त्याचा छोटा फॅन रवुला मणि कुशलसोबत संवाद साधताना दिसत आहे. राम चरणने मुलासोबत चांगला वेळ घालवला आणि त्याच्यासाठी भेटवस्तूही विकत घेतली. शिवाय त्याने मुलाला भावनिक आधार देत त्याच्या जीवनात आशेची भावना निर्माण केली. ज्यामुळे त्याला कर्करोगाविरोदात लढा सुरू ठेवण्याचे बळ मिळाले. याशिवाय राम चरण याने मुलाच्या पालकांचीही भेट घेतली. त्यांच्या खडतर प्रवासात त्यांना दिलासा आणि प्रोत्साहन दिले. राम चरण याच्या भेटीमुळे मुलाच्या चेहऱ्यावर हसू तर आलेच, पण त्याच्या दयाळूपणाने आणि औदार्याने प्रभावित झालेल्या अनेकांच्या भावेला स्पर्श केला.
#RamCharan met a 9 year old kid who's ailing from Cancer through make a wish foundation, Charan fulfilled the Kid's wish by spending some time with him
— Thyview (@Thyview) February 9, 2023
Golden Heart 💛 @AlwaysRamCharan pic.twitter.com/xDFrRH87bo
'मेक अ विश फाउंडेशन' ने दिग्दर्शक नंदिनी रेड्डी यांच्या मदतीने राम चरणला भेटण्याची मुलाची इच्छा पूर्ण केली आहे. रामचरणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेता शेवटचा एसएस राजामौली यांच्या आरआरआरमध्ये दिसला होता. आता तो RC 15 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. तर एस. शंकर दिग्दर्शित चित्रपटाचे शीर्षक आणि प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
महत्वाच्या बातम्या