Suspense Thriller Film: एकापाठोपाठ एक गायब होतात तरुण मुली, पोलिसही हतबल; डोक्याचा भुगा करते 'ही' 144 मिनिटांची फिल्म
Psychological Suspense Thriller Film: आजकाल, अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर उपलब्ध आहेत. जर तुम्हाला सस्पेन्स-थ्रिलरची आवड असेल, तर आम्ही तुम्हाला 2 तास 14 मिनिटांच्या एका सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत.
Psychological Suspense Thriller Film: जर तुम्ही ओटीटीवर एखादा दमदार चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल आणि चांगल्या चित्रपटाच्या शोधात असाल, तर एक चित्रपट आम्ही तुम्हाला सांगतो. नक्की पाहा... याची कथा उत्तम आहे आणि त्यात दमदार अभिनयाची झलकही तुम्हाला पाहायला मिळते. हा एक सायकॉलॉजिकल-थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये सस्पेन्स असा आहे की, तुम्ही विचार करुन करुन तुमच्या डोक्याचा भुगा होईल, पण तुम्ही डिकोड करू शकणार नाही. तुम्ही हा चित्रपट घरी बसून OTT वर पाहू शकता.
चित्रपटाचे नाव 'बोगनवेलिया'...
'बोगनवेलिया' असं या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचं नाव आहे. हा एक मल्याळम सायकॉलॉजिकल-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमल नीरड आहेत. हा तोच दिग्दर्शक आहे, ज्यानं बिग बी पासून बिलाल पर्यंतचे अनेक दमदार चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. हा चित्रपट 17 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि आता तुम्ही हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकता.
'बोगनवेलिया'मध्ये फहाद फासिल मुख्य भूमिकेत
'बोगनवेलिया' मध्ये पुष्पा स्टार फहाद फासिल मुख्य भूमिकेत आहे, यावरुन तुम्हाला समजलं असेलंच की, हा चित्रपट तुम्हाला किती खिळवून ठेवू शकतो. याशिवाय, चित्रपटात ज्योतिरमोयी, कुंचको बोबन यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 2 तास 24 मिनिटांचा आहे. पहिल्या 10-15 मिनिटांतच चित्रपटात ट्वीस्ट अँड टर्न्स सुरू होता. चित्रपटाचा फर्स्ट हाफ तुमच्या भुरळ घालतो आणि दुसरा भाग तर डोक्याचा पूर्णपणे भुगा करून टाकतो. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा या चित्रपटाला सरासरी प्रतिसाद मिळाला, पण आता ओटीटीवर हा चित्रपट भल्या भल्या चित्रपटांना टक्कर देत आहे.
'बोगनवेलिया'चं कथानक काय?
चित्रपटाच्या कथेत एका महिलेचा अपघात होतो. त्यानंतर त्याची स्मरणशक्ती हळूहळू कमी होऊ लागते. यामुळे शहरात तीन मुली बेपत्ता होतात. त्या तिन्ही मुली शेवटच्या वेळी त्याच महिलेसोबत दिसल्या होत्या. त्या धोकादायक खलनायकानं, जो खूप राक्षसी आहे, त्यांचं अपहरण केलं आहे. पोलीस प्रकरणाचा तपास सुरू करतात आणि महिलेची चौकशी करतात. पण त्या बाईला काहीच आठवत नाही.
IMDb रेटिंग काय?
चित्रपटाच्या कथेसोबतच या चित्रपटाची सिनेमेटोग्राफी उत्कृष्ट आहे. चित्रपटाचं पार्श्वसंगीत देखील या सायकॉलॉजिकल थ्रिलरची कथा रोमांचक बनवण्यास मदत करतं. चित्रपटाच्या IMDB रेटिंगबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटाला 10 पैकी 6.4 रेटिंग मिळालं आहे. तुम्ही हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर पाहू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :