एक्स्प्लोर

फिटनेसच्या बाबतीत शिल्पाच नाही तर मलायकाही टक्कर देते ‘ही’ टॉलिवूडची अभिनेत्री, फोटो पाहून चकित व्हाल..

साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक फिट आणि सुंदर अभिनेत्री आहेत. तमन्ना भाटिया, काजल अग्रवाल, समंथासारख्या अभिनेत्री चांगल्याच फिट आहेत. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल सध्या या अभिनेत्रींना देखील, एका नव्या अभिनेत्रीने फिटनेसच्या बाबतीत मागे टाकले आहे.

Seerat Kapoor : फिट राहणं ही काळाची गरज बनत चालली आहे. आजकाल सगळेच आपल्या फिटनेसकडे खास लक्ष देत आहेत. साधारण लोकसुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल करत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहे. हेल्दी जेवण, योग्य व्यायाम आणि त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिंक्सच्या दिशेने अनेकजण वाटचाल करत आहेत. फळे खाण्यावर अनेकजण भर देत होते. मात्र, आता त्याचे प्रमाण चांगेलच वाढल्याचे बघायला मिळते. सर्वसाधारण लोकं देखील आपल्या फिटनेसच्या बाबतीत चांगलेच जागरुक झाले आहेत. म्हणून आता मनोरंजन सृष्टीमध्ये असणारे अनेक सेलिब्रिटीज देखील आपल्या फिटनेसकडे अजून जास्त लक्ष केंद्रित करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने सर्वांनाच फिटनेस गोल्स दिले आहेत. वयाच्या 48८व्या वर्षी देखील मलायका अतिशय सुंदर आणि तरुणसुद्धा दिसते. फिटनेसच्या बाबतीत मालयकाच्या तोडीस तोड म्हणून नेहमीच 46 वर्षांच्या शिल्पा शेट्टीच नाव घेतलं जातं. शिल्पा शेट्टी सुरुवातीपासूनच खूप फिट आहे. मधल्या काळात काही अभिनेत्रींचे वेगवेगळ्या कारणांमुळे वजन वाढले होते.

बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकत साऊथच्या अभिनेत्रीची चर्चा!

काजोल, करीना कपूर, ऐश्वर्या राय यांचे मधल्या काळात चांगेलच वजन वाढले होते. पण, त्यांनी देखील लवकरच आपला फिटनेस पुन्हा प्राप्त केला. म्हणून बॉलिवूड ब्युटी फिटनेसमध्ये देखील वरचढ आहेत. पण, आज आम्ही बॉलिवूडच्या नाही, तर साऊथ इंडस्ट्रीमधल्या एका अत्यंत फिट आणि सुंदर अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत.

साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक फिट आणि सुंदर अभिनेत्री आहेत. तमन्ना भाटिया, काजल अग्रवाल, समंथासारख्या अभिनेत्री चांगल्याच फिट आहेत. मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल सध्या या अभिनेत्रींना देखील, एका नव्या अभिनेत्रीने फिटनेसच्या बाबतीत मागे टाकले आहे. अभिनेत्री सिरत कपूरने (Seerat Kapoor) सध्या सगळ्यांनाच चांगलाच फिटनेस गोल दिला आहे.

बॉलिवूडमध्येही केलेय काम!

बॉलिवूडमधील ‘जिद’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र तिने आपला मोर्चा साऊथच्या सिनेमांकडे वळवला. ‘टायगर’, ‘ओक्का क्षणाम’, ‘राजू गरी गढी’सारख्या सिनेमामध्ये तिने काम केले आहे. सिरत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या अकाऊंटवरून ती अनेक व्हिडीओ शेअर करत असते.

तिचे अनेक व्हिडीओ फिटनेसच्या, म्हणजेच व्यायामाच्या बाबतीत असतात. आपले जिममधले अनेक फोटोजसुद्धा ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. म्हणून, सध्या साऊथची फिटनेस क्वीन म्हणून अभिनेत्री सिरतचे नाव घेतले जाते.

अनेकांना सिरत इतकी फिट कशी काय आहे?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तर, तिने स्वतः आपल्या फिटनेसचे रहस्य सांगितले आहे. केवळ वर्कआऊटच नाही, तर सिरत फिट राहण्यासाठी योग्य डाएटदेखील फॉलो करते. योग्य प्रमाणात पाणी पिते आणि फळ खाते. या सर्वांसोबतच ती रोज 8 तासांची झोप घेते. त्यामुळे, अगदी योग्य अशा दिनचर्येमुळे ती इतकी जास्त फिट आणि सुंदर आहे, असं सिरतच मत आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget