Sourav Ganguly Biopic: मोठ्या पडद्यावर लवकरच उलगडणार सौरव गांगुलीचा जीवनप्रवास, गांगुलीकडून चित्रपटाची घोषणा
सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly) क्रिकेटर म्हणून प्रवास रुपेरी पडद्यावर येणार आहे. स्वत: सौरव गांगुली यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
Sourav Ganguly Biopic Film : भारतीय क्रिकेटमधला 'दादा' अर्थात टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या जीवनावर एक सिनेमा येणार आहे. महेंद्र सिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव यांच्यानंतर सौरव गांगुलीचा क्रिकेटर म्हणून प्रवास रुपेरी पडद्यावर येणार आहे. स्वत: सौरव गांगुली यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. सौरव गांगुलीच्या करिअरवर आधारित हा चित्रपट असणार आहे. लव फिल्मसद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.
मैदानावर पेय नेण्यास नकार दिल्याने जेव्हा संघातून वगळलं होतं; गांगुलीच्या 'दादा'गिरीचे न ऐकलेले किस्से
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने ट्वीट करत लिहिले आहे की, "क्रिकेटच माझे जीवन आहे. क्रिकेटने मला आत्मविश्वास दिला आहे. ज्यामुळे मी आज ताठ मानेने जगू शकलो. माझा हा प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की, लव फिल्मस माझा हा प्रवास मोठ्या पडद्यावर आणणार आहे".
Cricket has been my life, it gave confidence and ability to walk forward with my head held high, a journey to be cherished.
— Sourav Ganguly (@SGanguly99) September 9, 2021
Thrilled that Luv Films will produce a biopic on my journey and bring it to life for the big screen 🏏🎥@LuvFilms @luv_ranjan @gargankur @DasSanjay1812
फेमस फिल्ममेकर लव रंजन आणि अंकुर गर्ग या चित्रपटाला प्रोड्युस करणार आहे. चित्रपटात सौरव गांगुलीची भूमीका कोण करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अगोदर महेंद्र सिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनले आहे. सचिन तेंडूलकरच्या जीवनावर आधारित एक लघुपट बनला आहे. या शिवाय अनेक खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट बनले आहे. यामध्ये सानिया नेहवाल, मेरी कोम, मिल्खा सिंह यांचा समावेश आहे. सौरव गांगुलीच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट बघत आहे.
लव फिल्मसने आतापर्यंत निर्माण केलेले चित्रपट
लव फिल्मसने आतापर्यंत 'सोनू के टीटू की स्वीटी', 'दे दे प्यार दे' आणि 'छलांग' सारखे चित्रपटांची निर्मिती केली आहे. लव फिल्मसच्या आगामी चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची बायोपिक सुपरहिट ठरली होती. या चित्रपटात धोनीची भूमिका दिवंगत सुशांतसिंग राजपूत यांने साकारली होती. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवरही बायोपिक आली होती ज्यात इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होता. दरम्यान, माजी कर्णधार कपिल देव यांच्यावर देखील बायोपिक आहे. या सिनेमाचे नाव '83' आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण आहेत. मात्र हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही.