Sonalee Kulkarni : 'माझं एका राजकारण्याशी लग्न झालंय अन् त्यांनी माझ्यासाठी...', सोनालीने केला आयुष्यातील 'त्या' अफवेबद्दल खुलासा
Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने तिच्या आयुष्यातील एका अफेविषयी एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे.
![Sonalee Kulkarni : 'माझं एका राजकारण्याशी लग्न झालंय अन् त्यांनी माझ्यासाठी...', सोनालीने केला आयुष्यातील 'त्या' अफवेबद्दल खुलासा Sonalee Kulkarni Marathi Actress clarification on her affair with well known Politician in an interview detail marathi news Sonalee Kulkarni : 'माझं एका राजकारण्याशी लग्न झालंय अन् त्यांनी माझ्यासाठी...', सोनालीने केला आयुष्यातील 'त्या' अफवेबद्दल खुलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/6f8072b952eb74ed87244fdc08e55e3e1710422746212720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही नुकतीच एका मल्याळम चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यामुळे सोनाली हिंदी, मराठी सिनेविश्वासह दाक्षिणात्या सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडतेय. अनेकदा प्रसिद्ध अभिनेत्री किंवा अभिनेत्याच्या कामाची जितकी चर्चा होते, तितकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चा होते. अशातच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक अफवा पसरल्या जातात. अशाच एका अफवेविषयी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने खुलासा केलाय.
सोनालीने जयंती वाघधरेच्या पटलं तर घ्या या शोमध्ये तिच्या या अफेबद्दल खुलासा केला आहे. यावेळी सोनालीला तिच्या आयुष्यात तुझ्याबद्दल पसरलेल्या एका अफवेबद्दल विचारलं. त्यावेळी सोनालीनं माझं एका राजकारण्यासोबत लग्न झालं आहे, अशी अफवा पसरली होती, असं सोनालीनं म्हटलं आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सोनालीनं काय म्हटलं?
माझं एका पॉलिटिशनसोबत लग्न झालंय, त्यांनी मला राहायला घरं दिलंय. जेव्हा ही अफवा पसरली होती, तेव्हा मला अनेकांचे फोन आले. माझ्या चुलत बहिणीने देखील मला फोन करुन विचारलं की काय तुझं लग्न झालंय का? मी तिला म्हटलं की, अगं माझं लग्न झालं तर मी तुला लग्नाला बोलवेन, बहिण आहेस माझी तू, तेव्हा ती म्हणाली होती अगं होऊ शकतं. पण असं कधीच काहीच नव्हतं. या निव्वळ चर्चा होत्या, असा खुलासा सोनालीने केलाय.
सोनाली कुलकर्णीचा अभिनयाचा प्रवास
सोनाली कुलकर्णी हीने बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. नटरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत. तसेच सोनालीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिची मोहोर उमटवली आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)