Sisu Road To Revenge Box Office Collection Day 1: 66 वर्षांच्या हिरोचा बॉक्स ऑफिसवर दबदबा, पहिल्याच दिवशी कमावले 50 कोटी; ओपनिंग कलेक्शनची रक्कम ऐकली तर, हैराण व्हाल
Sisu Road To Revenge Box Office Collection Day 1: भारतात 'सिसू रोड टू रिव्हेंज'ची खूप क्रेझ होती. ही कथा रक्तपात, कच्ची कृती, जगण्याची आणि बदलाची आहे.

Sisu Road To Revenge Box Office Collection Day 1: 21 नोव्हेंबरला थिएटर्समध्ये अनेक सिनेमे रिलीज करण्यात आले. यामध्ये वेगवेगळ्या जॉनरचे अनेक सिनेमे रिलीज करण्यात आले. अडल्ड कॉमेडी 'मस्ती 4'पासून (Masti Movie) अगदी वॉर ड्रामा (War Drama) '120 बहादुर'पर्यंत (120 Bahadur) अनेक सिनेमांचा समावेश होता. यापैकी एक फिनलँडची ब्लॉकबस्टर फिल्म (Finland Blockbuster Film) 'Sisu'च्या दुसऱ्या भागाचाही समावेश होता. या फिल्मचा पहिल्या पार्टला आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप पसंती मिळालेली. तसेच, हा पार्ट जास्त चर्चेतही होता. ज्यानंतर या फिल्मचा दुसरा पार्टही रिलीज करण्यात आलाय. या सिनेमाचं नाव 'सिसू रोड टू रिवेंज' (Sisu Road To Revenge) आहे. 'सिसू रोड टू रिवेंज' भारतातही खूप चालला. अॅक्शनचा भडिमार असलेल्या या फिल्मनं पहिल्याच दिवशी किती कलेक्शन केलं, सविस्तर जाणून घेऊयात.
भारतात किती कमावले?
भारतात 'सिसू रोड टू रिव्हेंज'ची खूप क्रेझ होती. ही कथा रक्तपात, कच्ची कृती, जगण्याची आणि बदलाची आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटानं पहिल्या दिवशी भारतात 0.5 कोटींचं कलेक्शन केलंलं. पहिल्या दिवसाची कमाई कमी होती, पण दुसऱ्या दिवसापासून हाऊसफुल्लचे बोर्ड लागले. दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन आतापर्यंत 0.2 कोटींवर पोहोचलंय. हा सर्व डेटा संध्याकाळपर्यंत उघड होईल. 'सिसू रोड टू रिव्हेंज'च्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर, तो 12.2 दशलक्ष डॉलर्समध्ये बनवण्यात आला होता. दरम्यान, पहिल्याच दिवशी सिनेमानं 50 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
सिनेमातल्या स्टारकास्टबाबत थोडसं...
'सिसू रोड टू रिव्हेंज'च्या स्टारकास्टबाबत बोलायचं झालं तर, यामध्ये 66 वर्षीय जोरमा टॉमिला, स्टीफन लंग, रिचर्ड ब्रेकसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेले. फिल्मबाबत बोलायचं झालं तर, ही एक वॉर बेस्ड फिल्म आहे. ज्यामध्ये कोर्पी त्याच्या कुटुंबाची हत्या झालेल्या घराची मोडतोड करतो आणि ते घर सुरक्षित ठिकाणी पुन्हा बांधण्यासाठी ट्रकवर लादतो. लवकरच तो एका हिंसक क्रॉस कंट्री पाठलागात सापडतो, कारण त्याच्या कुटुंबाची हत्या करणारा रेड आर्मी कमांडर काम पूर्ण करण्यासाठी परत येतो. हा सिनेमा 'जलमारी हेलँडर' यांनी दिग्दर्शित केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















