Guitar Vajtay : आदर्श शिंदेच्या दमदार आवाजात रेकॉर्ड झालं ‘गिटार वाजतंय’ रोमँटिक गाणं! नवरात्रीतही मिळते गाण्याला पसंती
Ti Majhi Premkatha : 'ती माझी प्रेमकथा' चित्रपटातील तुषार आणि पद्मिनी यांच्या लव्हेबल पोस्टरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
Ti Majhi Premkatha : 'ती माझी प्रेमकथा' (Ti Majhi Premkatha) चित्रपटातील तुषार आणि पद्मिनी यांच्या लव्हेबल पोस्टरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. नवोदित जोडगोळीचे या चित्रपटातील पहिले वहिले प्रेम बहरवणारे 'तुला बघून मनामध्ये गिटार वाजतंय' (Guitar Vajtay ) हे गाणे प्रेमी युगुलांच्या मनाचा ठाव घ्यायला सज्ज झाले आहे. नवरात्रीतही हे गाणे रसिकांना ठेका धरायला लावत आहे. तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील रसिकांना भावणारं आणि चित्रपटाच्या कथेशी एकरूप होणारं असं हे गाणं सोशल मीडियावर अफलातून गाजत आहे. रिलीज होताच या गाण्यानं तूफान हिट्स मिळवत सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदेच्या सुमधुर आणि दमदार आवाजात गायलेलं हे रोमँटिक गाणे असून, या गाण्याच्या ओळी संगीतकार राजवीर गांगजी यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. तर, गाण्याच्या काही अधिक ओळी सुनील शिंदे लिखित आहेत. या गाण्याच्या संगीताची जबाबदारीही राजवीर गांगजी यांनी पार पाडली आहे. 'फिल्मी टाईम प्रोडक्शन' सह आणि 'कनिष्क अँड त्रिगेश एंटरटेनमेंट' सोबत निर्माते राजकुमार देगलूरकर, ओमप्रकाश बुक्कवार निर्मित 'ती माझी प्रेमकथा' हा प्रेममय चित्रपट येत्या 14 ऑक्टोबरला प्रेक्षकांसमोर येणार आहे.
तरूण पिढीला एक मोठा संदेश!
एकूणच हा चित्रपट फक्त प्रेमकथा नसून, आजच्या तरूण पिढीला एक मोठा संदेश आहे. या चित्रपटातील एक रोमँटिक गाणे सिनेरसिकांच्या भेटीस आले आहे. अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धकिते या नव्या कोऱ्या जोडीने 'ती माझी प्रेमकथा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. दिग्दर्शक सूर्या यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि स्क्रीनप्ले अशा तीनही जबाबदाऱ्या उत्तम पार पाडल्या आहेत. तर या चित्रपटाच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची जबाबदारी कपिल जोंधळे यांनी सांभाळली आहे. 'ती माझी प्रेमकथा' चित्रपटातील 'गिटार वाजतंय' हे गाणं नक्कीच प्रेमी युगुलांच्या दिलाचा ठोका चुकवेल यांत शंकाच नाही.
पाहा गाणे :
काय आहे कथानक?
एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत प्रेमाच्या बंधनात अडकत गेल्यानंतर काही कालावधीने संशय आणि अविश्वासाने मारलेली उडी त्या प्रेमाचा अंत करते की, ते प्रेम अविश्वासाला थारा देत नाही हे 'तू माझी प्रेमकथा' या चित्रपटात पाहणे रंजक ठरणार आहे. सिद्धू आणि रेणूची जोडगोळी या चित्रपटात एक आगळी वेगळी कथा मोठ्या पडद्यावर आणणार आहे. पोस्टरवरील नवोदित कलाकारांचा फर्स्ट लूक प्रेमाच्या रंगात आणखीनच खुलून आला असल्याचे दिसत आहे. येत्या 14 ऑक्टोबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
हेही वाचा :