Sikandar Box Office Collection Day 10: 'छावा'समोर 'सिकंदर' सुपरफ्लॉप, 10 दिवसांत बजेटही वसूल करता आलं नाही; आतापर्यंतच्या कलेक्शनचा आकडा ऐकाल तर...
Sikandar Box Office Collection Day 10: सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरताना दिसत आहे. आता हा चित्रपट काही कोटी रुपयेही कमावण्यासाठी धडपडत असल्याचं पाहायला मिळतंय.

Sikandar Box Office Collection Day 10: दिग्दर्शक एआर मुरुगदास यांचा 'सिकंदर' (Sikandar) हा चित्रपट ईदच्या निमित्तानं 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सलमान खानच्या (Salman Khan) स्टारडमचा विचार करता, या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, पण तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. चित्रपटाची सुरुवात खराब झाली आणि चौथ्या दिवशी त्याचं कलेक्शन सिंगल डिजिटवर येऊन थांबलं. तेव्हापासून हा चित्रपट काही कोटींच्या कमाईसाठीही संघर्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'सिकंदर'नं रिलीजच्या दहाव्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या मंगळवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
'सिकंदर' नं रिलीजच्या दहाव्या दिवशी किती कोटींची कमाई केली?
सलमान खान आणि रश्मिका मंदाना स्टारर 'सिकंदर' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. भाईजानचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेनं वाट पाहत होते, पण थिएटरमध्ये आल्यानंतर त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ज्यामुळे त्याच्या कमाईवर परिणाम झाला. चाहते चित्रपटाच्या कथेपासून ते सलमान खानच्या अॅक्शन सीन्सपर्यंत, प्रत्येक गोष्टीवर खूप टीका होत आहे. या राजकीय अॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या प्रदर्शनाला 10 दिवस झाले आहेत आणि त्याचं बजेटही वसूल झालेलं नाही. जर आपण भारतातील चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोललो तर
- 'सिकंदर'नं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 90.25 कोटी रुपये कमावले होते.
- यानंतर, सहाव्या दिवशी कलेक्शन 3.5 कोटी होतं आणि सातव्या दिवशी चित्रपटानं 4 कोटी कमावले.
- आठव्या दिवशी 'सिकंदर'नं 4.75 कोटी रुपये कमावले आणि नवव्या दिवशी चित्रपटानं 1.75 कोटी रुपयांची कमाई केली.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी म्हणजेच, दुसऱ्या मंगळवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सिकंदर'नं रिलीजच्या दहाव्या दिवशी 1.35 कोटींचा व्यवसाय केला आहे.
- यासह, 'सिकंदर'ची 10 दिवसांत एकूण कमाई 105.60 कोटी रुपये झाली आहे.
'सिकंदर' सुपरडुपर फ्लॉप
'सिकंदर' चित्रपटाची बॉक्स ऑफिस कामगिरी खूपच निराशाजनक आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांतच फ्लॉप ठरला आहे आणि काही कोटींची कमाई करण्यात तो यशस्वी झाला नाही. 'सिकंदर'ची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, आता बॉक्स ऑफिसवर टिकणं कठीण दिसत आहे. तुम्हाला कदाचित हे जाणून आश्चर्य वाटेल की, सलमान खानचा ईदला प्रदर्शित झालेला चित्रपट 10 दिवसांनंतरही 200 कोटी रुपयांचा खर्च वसूल करू शकला नाही. या चित्रपटानं आतापर्यंत 105 कोटी रुपये कमावले आहेत आणि तो ज्या गतीने पुढे जात आहे ते पाहता, 200 कोटी रुपयांचा आकडा गाठणंही अशक्य असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत 'सिकंदर' आता फ्लॉप ठरला आहे, असं आपण म्हणू शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























