Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: कन्फर्म! 'क्योंकि सास भी कभी बहू थी'चा पार्ट 2 येणार, तुलसीची भूमिका स्मृती इराणीच साकारणार
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: एकता कपूरनं 'क्यूंकी सास भी कभी बहू थी 2' ची घोषणा केली आहे. यासोबतच, तिनं या मालिकेतील मुख्य पात्र तुलसी विरानीची भूमिका, केंद्रीय मंत्री स्मृती इराणीच साकारली, अशी मोठी हिंटही एकता कपूरनं दिली आहे.

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2: टेलिव्हिजन विश्वात (Television World) गाजलेली मालिका 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi). या मालिकेनं टेलिव्हिजन विश्वात क्रांती घडवली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मालिकेत अनेक ट्वीस्ट अँड टर्न्स होते, काही प्रसंग असे दाखवले गेलेले की, त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. तरीसुद्धा लोकांनी या मालिकेला डोक्यावर घेतलं. या मालिकेनं गृहिणींपासून अगदी नोकरारवर्गापर्यंत सर्वांना खिळवून ठेवलेलं. पण, आता या मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. लवरच या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे.
'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मालिकेत स्मृती इराणी यांनी साकारलेलं 'तुलसी विरानी' हे पात्र घराघरात प्रसिद्ध होतं. ही मालिका आठ वर्षांमध्ये सर्वाधिक टीआरपी मिळवणारी सर्वात जास्त काळ चालणारी मालिका होती. काही काळापासून अशी चर्चा होती की, एकता कपूर दुसऱ्या सीझनमध्ये जुन्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अखेर निर्मात्यांनी हे सर्व मान्य केलं.
एकता कपूर घेऊन येत आहे 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'चा पार्ट 2
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, एकता कपूरनं तिचा कल्ट शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' पुन्हा येणार असल्याचं मान्य केलं आहे. तिनं शोचा दुसरा सीझन 150 भागांचा असेल हे देखील उघड केलं आहे. यामागील कारण स्पष्ट करताना एकता म्हणाली की, जेव्हा मूळ टीव्ही शो संपला, त्यावेळी 2000 एपिसोड्सचा आकडा गाठण्यासाठी 150 एपिसोड्स शिल्लक होते. त्यामुळे या शोवरच्या आमच्या प्रेमानं सर्वांना पुन्हा एकदा एकत्र आणून त्याचे 150 भाग पूर्ण केले आहेत. आणि 2000 एपिसोड्सचा टप्पा गाठला आहे. हा या मालिकेचा हक्क आहे."
स्मृती इराणीच 'तुलसी'च्या भूमिकेत दिसणार?
एवढंच नाही तर, एकता कपूरनं पुढे सांगितलं की, या रीबूटमध्ये एक राजकारणी देखील असेल, ज्यामुळे शोमध्ये स्मृती इराणी 'तुलसी विरानी' म्हणून परत येतील, अशी हिंट प्रेक्षकांना मिळाली आहे. एकता कपूर म्हणाली की, "आपण मनोरंजनात राजकारण आणत आहोत, किंवा अधिक चांगल्या प्रकारे सांगायचं तर, आपण राजकारण्यांना मनोरंजनात आणत आहोत."
'मिहिर विरानी' ची भूमिका कोण साकारणार?
यापूर्वी समोर आलेल्या मिडिया रिपोर्ट्सनुसार, रीबूट मालिकेत मूळ कलाकार अमर उपाध्याय 'मिहिर विरानी' आणि स्मृती इराणी 'तुलसी विरानी' म्हणून दिसतील. दरम्यान, एकता कपूरनं 'मिहिर'ची भूमिका कोण साकारणार हे निश्चित केलेलं नाही. पण हाती आलेल्या माहितीनुसार, याबद्दल हितेन तेजवानी, अमर उपाध्याय आणि रोनित रॉय यांच्याशी चर्चा सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























