Siddharth jadhav : जेव्हा राष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाचं कौतुक केलं जातं..., सिद्धार्थ जाधवचा दिल्लीत बहुमान, अभिनेत्याने शेअर केली पोस्ट
Siddharth jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला असून राष्ट्रीय स्तरावर त्याचा सन्मान करण्यात आला आहे.
![Siddharth jadhav : जेव्हा राष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाचं कौतुक केलं जातं..., सिद्धार्थ जाधवचा दिल्लीत बहुमान, अभिनेत्याने शेअर केली पोस्ट Siddharth jadhav Marathi actor recevied BEST ACTOR JURY for Balbharati Movie in 14th Dadasaheb Phalke Film Festival Entertainment latest update detail marathi news Siddharth jadhav : जेव्हा राष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाचं कौतुक केलं जातं..., सिद्धार्थ जाधवचा दिल्लीत बहुमान, अभिनेत्याने शेअर केली पोस्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/3b12ad18ab509a2bbe4aaf7a86a613d81717934384021720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Siddharth jadhav : कोणताही पुरस्कार मिळणं ही प्रत्येक कलाकारासाठी कौतुकाची थाप असते. त्यातच राष्ट्रीय स्तरावर होणारं कौतुक हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं. अशाच एका मराठी कलाकाराच्या कामाचं राष्ट्रीय पातळीवर कौतुक करण्यात आलंय. अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth jadhav) याला 14 व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलमध्ये जुरीचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
सिद्धार्थ जाधवला त्याच्या बालभारती सिनेमासाठी हा पुरस्कार देण्यात आलाय. त्यानिमित्ताने सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने रसिक प्रेक्षकांचेही आभार मानले आहेत. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिद्धार्थचा बालभारती हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सिद्धार्थसह अभिजीत खांडकेकर,नंदिता पाटकर,बालकलाकार आर्यन मेंघजी, उषा नाईक, रवींद्र मंकणी, संजय मोने या कलाकरांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
सिद्धार्थची पोस्ट नेमकी काय?
BEST ACTOR (JURY ) बालभारती , नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या चौदाव्या "दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल 2024" मध्ये आमचा सिनेमा "बालभारती" यासाठी मला जुरीचं "बेस्ट ऍक्टर" हे अवॉर्ड मिळालं. मनापासून आनंद होतो "बालभारती" सिनेमातलं माझं काम राष्ट्रीय पातळीवर ऍप्रिसिएट केलं जातंय. काम करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेता त्यावर कोणीतरी कौतुकाची थाप देत आहे. देशभरातले सगळे रिजनल सिनेमे यात सहभागी झाले होते आणि त्यातून बालभारतीसाठी award मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे . आमचे निर्माते, सुजय सर ,कोमल मॅम, संपूर्ण टीम आणि मनापासून आभार मानतो मी आमचे दिग्दर्शक लेखक यांचेही आभार.
View this post on Instagram
सिद्धार्थच्या पोस्टवर कलाकारांकडून अभिनंदनचा वर्षाव
सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी देखील कमेंट करत त्याचं अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री तेजस्वी पंडित हिने देखील कमेंट करत त्याला शाब्बास असं म्हटलं आहे. तसेच सुकन्या मोने यांनी देखील त्याचं अभिनंदन केलं आहे. अभिजीत खांडकेकर, अशोक फलदेसाई, अभिषेक रहाळकर या कलाकरांनी सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)