(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bal Bharti: प्रत्येक आईवडील, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षकासाठी! ‘बालभारती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित
Bal Bharti Marathi Movie : बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘बालभारती’चे (Bal Bharti) पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले.
Bal Bharti Marathi Movie : बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘बालभारती’चे (Bal Bharti) पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. स्फियरओरिजीन्स यांनी निर्मिती आणि नितीन नंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पोस्टरची पहिली झलकच चित्रपटाचे वगळेपण दाखवतो. बालभारती हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.
या पोस्टरमध्ये चित्रपटाचा खरा नायक अर्थात आर्यन मेंघजी (Aaryaan Menghji) हा बालकलाकार झळकला आहे. त्याच्यासोबत मराठीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ जाधव (Siddharth jadhav), अभिजित खांडकेकर (Abhijeet Khandkekar) आणि नंदिता पाटकर (Nandita Patkar) हे देखील दिसत आहेत. आर्यन एक महान शास्त्रज्ञ असणाऱ्या आईनस्टाईन यांच्या पोशाखात दिसतोय. आर्यनच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थच्या हातात इंग्रजीतून मराठी शब्दकोश आहे, तर नंदिताने हेल्मेट घातले आहे, ज्यावर टॉक इन इंग्लिश असे शब्द लिहिलेले आहेत. यावरून नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटाच्या विषयाचा अंदाज येईल. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या विषयाची चर्चा आहे.
पाहा पोस्टर :
पालकांना त्यांच्या मुलांसाठी सर्वात जास्त काय हवे आहे, तर उत्तम शिक्षण. हीच कळकळ यात गुंफलेली आहे. बालभारती म्हणजे गमतीशीर कथा आणि मनाला भिडणारा संदेश यांची गुंफण. हा चित्रपट महाराष्ट्रीय संस्कृती आणि मराठी भाषेत रुजलेला आहे. तो मराठी भाषा, सर्जनशीलता आणि शोध यांना एकत्र आणतो तोही अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने. योगायोगाने हा चित्रपट आजच्या ‘जय संशोधन’ या घोषणेशी सुसंगत आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय संशोधन ही नवीन घोषणा आहे.
दिग्गज कलाकारांच्या भूमिका
कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय,मधुर संगीत आणि हृदयस्पर्शी कथा यांचा एक अनोखा मिलाफ असलेला बालभारती प्रत्येक महाराष्ट्रीयन घरातील मनाला नक्कीच स्पर्श करेल. निर्माते कोमल आणि संजय वाधवा म्हणाले, ‘आम्ही हा चित्रपट खूप श्रद्धेने आणि उत्कटतेने बनवला आहे. आम्हाला आशा आहे की सर्वांनाही तो आवडेल’.
दिग्दर्शक नितीन नंदन म्हणतात की, ‘संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञानी या चित्रपटावर मनापासून आणि उत्कटतेने काम केले आहे आणि प्रेक्षकांना ही हा सिनेमा आपलासा वाटेल. प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांसाठी हा चित्रपट आहे.’ लवकरच बालभारतीचा ट्रेलर मोठ्या थाटात लाँच होणार आहे. बालभारतीमध्ये सिद्धार्थ जाधव, नंदिता पाटकर, उषा नाईक, आर्यन मेंघजी, रवींद्र मंकणी आणि खास भूमिकेत अभिजीत खांडकेकर आहेत.
हेही वाचा :