Marathi Celebrities at Ed Sheeran Concert : 8 तास उभं राहिल्याचं समाधान अन्..., Ed Sheeran च्या कॉन्सर्टला लावली 'या' मराठी कलाकारांनी हजेरी, मिताली मयेकरने शेअर केली पोस्ट
Marathi Celebrities at Ed Sheeran Concert : मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन Ed Sheeran च्या कॉन्सर्टमधला एका व्हिडिओ शेअर केलाय. त्याला तिने दिलेल्या कॅप्शने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
Marathi Celebrities at Ed Sheeran Concert : मुंबईत नुकतच हॉलीवूडचा प्रसिद्ध गायक Ed Sheeranचा कॉन्सर्ट पार पडला. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे हा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टला हजारोंच्या संख्येत प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. त्यातच काही मराठी कलाकार देखील या कॉन्सर्टला उपस्थित होते. अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) हीने या कॉन्सर्टमधला कलाकरांचा फोटो शेअर केलाय. मितालीसोबत या कॉन्सर्टला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar), गायक रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) हे देखील गेले होते.
मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन या कॉन्सर्टमधला एका व्हिडिओ देखील शेअर केलाय. त्याला तिने दिलेल्या कॅप्शने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. मुंबईत मागील काही दिवसांपासून Ed Sheeran च्या कॉन्सर्टची साऱ्यांनाच उत्सुकता होती. त्यातच या कलाकारांनी देखील या सोहळ्याला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
मितालीने शेअर केली पोस्ट
मितालीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने त्या व्हिडिओत म्हटलं की, जेव्हा Ed Sheeran तुम्हाला रिपॉन्स देतो. त्यानंतर तिने त्या व्हिडिओला कॅप्शन दिलं की, आम्ही 8 तास उभं राहिलो ते खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं कारण, या भव्य कॉन्सर्टनंतर आमचे डोळे पाणावले होते.” मितालीने शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय. मितालीने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये Ed Sheeran आणि दिलजीत हे दोघेही लाइव्ह परफॉर्म करत असल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
Ed Sheeran कॉन्सर्टची चर्चा
मुंबईत ऑर्गनाईज करण्यात आलेल्या Ed Sheeran च्या कॉन्सर्टला हजारो आणि लाखाोंच्या संख्येने लोकं उपस्थित होती. दरम्यान Ed Sheeranने त्याच्या या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये दिलजीतला देखील अचानक स्टेजवर बोलावलं. याची कल्पना लोकांना नव्हती. त्यामुळे या दोघांच्याही गाण्यांची पर्वणी उपस्थितांना मिळाली.
View this post on Instagram