Siddhant Chaturvedi:'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदीने घेतली आलिशान कार; किंमत ऐकून व्हाल अवाक्!
Siddhant Chaturvedi: सिद्धार्थनं लँड रोव्हर कार खरेदी केली आहे. जाणून घेऊयात त्याच्या या नव्या कारची किंमत...
Siddhant Chaturvedi: 'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने (Siddhant Chaturvedi) नुकतीच एक नवीन आलीशान कार खरेदी केली. सिद्धार्थनं लँड रोव्हर कार खरेदी केली आहे. सिद्धांतने मुंबईतील लँड रोव्हर शोरूममधून लँड रोव्हर SUV कारची डिलिव्हरी घेतली. या कारची किंमत किती आहे? जाणून घेऊयात...
सिद्धांतच्या नव्या कारची किंमत किती?
सिद्धांत चतुर्वेदी खरेदी केलेली लँड रोव्हर कार ही 3.0-लिटर डिझेल ऑटोबायोग्राफीचे व्हीलबेस व्हर्जन आहे. ज्याची किंमत जवळपास 1.81 कोटी रुपये आहे. सिध्दांत चतुर्वेदीने काल (मंगळवारी) रात्री मुंबईत पार पडलेल्या 'खो गये हम कहां' चित्रपटाच्या सक्सेस बॅशमध्ये हजेरी लावली. या चित्रपटात स्टँड अप कॉमिकची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थनं त्याच्या नवीन लँड रोव्हर स्पोर्ट कारमधून सक्सेस बॅशमध्ये एन्ट्री केली. सिद्धांतने त्याच्या नवीन लक्झरी कारसोबत फोटोसाठी पोज देखील दिल्या.
लँड रोव्हर मुंबई नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सिद्धांतच्या नव्या कारचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
View this post on Instagram
'खो गये हम कहां' ला मिळाली प्रेक्षकांची पसंती
खो गये हम कहां या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये सिद्धांत अनन्या पांडे आणि आदर्श गौरव यांनी देखील हजेरी लावली. खो गये हम कहां हा चित्रपट 26 डिसेंबर 2023 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक केलं. ‘खो गये हम कहां’ या चित्रपटाच्या माध्यमातून अर्जुन वरैन सिंहनं दिग्दर्शनात पदार्पण केलं. अर्जुनने झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी या चित्रपटाचे कथानक लिहिले आहे. रितेश सिधवानी, अख्तर, कागती आणि फरहान अख्तर यांनी 'खो गये हम कहां' या चित्रपटाची निर्मिती केली होती.
सिद्धांतचे चित्रपट
सिद्धांतनं 2016 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानं 'लाइफ सही है' आणि 'इनसाइड एज' या सीरिजमध्ये काम केलं. तसेच त्याचे फोन भूत, गली बॉय, गेहरांईया आणि बंटी और बबली यांसारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. सिद्धांतच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: