(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shyam Rangila : कॉमेडियन श्याम रंगीलाने शेवटच्या दिवशी दाखल केला अर्ज, पंतप्रधान मोदींविरोधात लोकसभेच्या मैदानात
Shyam Rangila : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला म्हणजे श्याम सुंदर याने मंगळवारी अपक्ष लोकसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान वारणसीमध्ये एकूण 41 उमेदवार रिंगणात आहेत.
Shyam Rangila : प्रसिद्ध कॉमेडियन श्याम रंगीलाने (Shyam Rangila ) वाराणसी (Varanasi) लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी हा महत्त्वाचा मतदारसंघ असून , जूनमध्ये निवडणुकीचा इथे पाहायला मिळेल. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात म्हणजे 1 जून रोजी वाराणसीत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 14 मे ही शेवटची तारीख होती. विशेष म्हणजे याच मतदारसंघातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देखील रिंगणात आहे. त्यांनी देखील आजच्याच दिवशी अर्ज केला. तसेच लोक पक्षाचे विनयकुमार त्रिपाठी, भाजपचे सुरेंद्र नारायण सिंह, अपक्ष उमेदवार दिनेशकुमार यादव, रीना राय, नेहा जैस्वाल, अजितकुमार जैस्वाल, अशोक कुमार पांडे-अपक्ष, संदीप त्रिपाठी यांनी देखील अर्ज दाखल केले आहेत.
उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा मतदारसंघांपैकी एक म्हणून वाराणसीला राजकीय महत्त्व आहे. 2019 च्या मागील लोकसभा निवडणुकीत वाराणसीमधून पंतप्रधान मोदी यांचा ऐतिहासिक विजय झाला होता. तब्बल 674,664 मते मिळवून, पंतप्रधान मोदींनी शालिनी यादव यांच्यावर विजय मिळवला. त्याच मतदारसंघातून श्याम रंगीला देखील आता रिंगणात उतरला आहे. त्यामुळे यंदाची वाराणसीची लढत ही चांगलीच रंगणार असल्याची चिन्हं आहेत.
41 उमेदवार रिंगणात
याशिवाय अखिल भारतीय परिवार पक्षाचे हरप्रीत सिंग, अपक्ष उमेदवार नरसिंग, मूलभूत हक्क पक्षाचे संतोषकुमार शर्मा, मानवता भारत पक्षाचे हेमंतकुमार यादव, राष्ट्र उदय पक्षाचे सुरेश पाल, अपक्ष उमेदवार रामकुमार जैस्वाल, गांधीयन पीपल्सचे यशवंत कुमार गुप्ता यांचा समावेश आहे. पक्ष, नित्यानंद पांडे, अमित कुमार, जनहित किसान पार्टीचे विजय नंदन, भारतीय राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनील कुमार, अपक्ष उमेदवार श्याम सुंदर उर्फ श्याम रंगीला, तुषा मित्तल, विक्रम कुमार वर्मा, पीस पार्टीचे परवेझ कादिर खान, अपक्ष योगेश कुमार शर्मा, अपक्ष उमेदवार डॉ. वंचित इंसाफ पक्षाचे वेदपाल शास्त्री आणि अपक्ष उमेदवार सुरेंद्र रेड्डी यांच्यासह एकूण 27 उमेदवारांनी आजच्या दिवशी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता वारणसीतून एकूण 41 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
श्याम रंगीला अर्ज भरताना अडचणी
दरम्यान, सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर करताना श्याम रंगीलाने म्हटलं की, माझ्याकडे सगळी कागदपत्र असूनही माझा अर्ज स्वीकारला जात नाहीये. त्यांनी मला माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यास सांगितलं असल्याचा दावा देखील त्याने यावेळी केला आहे. हा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतंय.
वाराणसी चुनाव आयोग कार्यालय
— Shyam Rangeela (@ShyamRangeela) May 14, 2024
14 मई, सुबह 9:15 बजे लगभग पहुँच गये है,
कहीं से कोई जवाब नहीं आ रहा,
लेकिन नामांकन की उम्मीद अभी भी नहीं छोड़ी है हमने pic.twitter.com/MfirxtfNZk
कोण आहे श्याम रंगीला?
पंतप्रधान मोदी यांची मिमिक्री केल्याने श्याम रंगीला ओळखला जाऊ लागला. त्याने अनेक मुद्द्यांवर कॉमेडी व्हिडिओही बनवले जे बरेच व्हायरल झाले.2017 मध्ये त्यांनी स्टार प्लस शो 'लाफ्टर चॅलेंज' च्या मंचावर पंतप्रधान मोदींची नक्कल केली होती. अक्षय कुमार, झाकीर खान, मल्लिका दुआ, हुसैन दलाल या शोमध्ये जज म्हणून सामील होते. दरम्यान माहितीनुसार, त्याचा हा व्हिडिओ टीव्हीवर दाखवण्यात आला नाही, पण त्यावेळी त्याला वेगळं कारण सांगण्यात आलं होतं. श्याम रंगीलाचे यूट्यूबवर जवळपास साडेनऊ लाख फॉलोअर्स आहेत.
आप सभी के प्यार और सहयोग से नियमानुसार सभी आवश्यकताओं की पूर्ति करते हुए मैंने नामांकन दाखिल कर दिया है, मेरा इस देश के लोकतंत्र पर अभी भी पुरा भरोसा है । अब आगे के दो तीन दिन महत्वपूर्ण होंगे।
— Shyam Rangeela (@ShyamRangeela) May 14, 2024
आप सभी का सहयोग के लिए बहुत धन्यवाद ।
हमारे लोकतंत्र के पहरी सभी चुनाव अधिकारीयों के… pic.twitter.com/JyIoFGDNli