एक्स्प्लोर

Shyam Benegal Death : श्याम बेनेगल यांच्या 'मुजीब'ने बांगलादेशातच्या राजकारणात माजवली खळबळ, सत्तापालटही केलं; नेमकं प्रकरण काय?

Shyam Benegal Movie: श्याम बेनेगल यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. मुजीबही त्यापैकीच एक. या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर बांगलादेशातही मथळे निर्माण केले आहेत.

Shyam Benegal Movie:  बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांचे निधन झाले आहे. . सोमवारी सायंकाळी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्याम बगेनल हे त्यांच्या दमदार चित्रपटांसाठी ओळखले जात होते. अनेक आशयघन सिनेमे त्यांनी आजवर केले आहेत. इतकच नव्हे त्यांच्या एका सिनेमाने बांगलादेशात खळबळ माजवली होती. 'मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन' असे या चित्रपटाचे नाव आहे.

श्याम बेनेगल यांचा मुजीब हा चित्रपट बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्यावर आधारित होता. जे बांगलादेशचे राष्ट्रपतीही होते. त्यांच्या जीवनावर बनवलेल्या चित्रपटामुळे 2024 मध्ये बांगलादेशात सत्तापालट झाला आणि शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला.

2023 मध्ये रिलीज झाला सिनेमा

श्याम बेनेगल यांचा 'मुजीब : द मेकिंग ऑफ अ नेशन' हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात मुजीबूर रहमानच्या राजकीय प्रवासाची सुरुवात दाखवण्यात आली होती. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी कसे काम केले हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात आरिफीन शुवू मुजीबच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला.

सिनेमाची कथा काय?

मुजीब यांच्या बालपणापासून ते 9 महिने ते पाकिस्तानच्या तुरुंगात असल्याच्या दिवसापर्यंतची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तुरुंगातून जेव्हा ते त्यांच्या देशात परतले तेव्हा ते लोकांना सांगतात की, तुरुंगात त्यांना फाशी दिली जाणार होती. तसेच सिनेमाच्या शेवटी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या होते आणि लष्करी उठाव होतो, असं दाखवण्यात आलं आहे. पण या सगळ्यातून शेख हसीना आणि त्यांची बहिण वाचते कारण त्यावेळी दोघीही देशापासून दूर जर्मनीत होत्या. 

8 चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार, अनेक हीट चित्रपट

बेनेगल यांनी जुबैदा, द मेकिंग ऑफ द महात्मा, नेताजी सुभाष चंद्र बोसः द फॉरगोटन हीरो, मंडी, आरोहन, वेलकम टु सज्जनपुर यांसारखे अनेक दर्जेदार आणि लोकप्रिय चित्रपट बनवले. त्यांच्या आर्ट चित्रपटांनी 8 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. श्यान बेगेनल यांना सिनेसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. श्याम बेनेगल यांनी करियरमध्ये 24 चित्रपट, 45 डॉक्यूमेंट्री आणि 1500 एड फिल्म्स बनवल्या आहेत. 

ही बातमी वाचा : 

आशयघन सिनेसृष्टीचा चेहरा हरपला, प्रायोगिक चित्रपट चळवळीचा खंदा पाईक काळाच्या पडद्याआड; श्याम बेनेगल कालवश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Special Report : मस्साजोग, परभणी प्रकरणात फक्त राजकारण होतंय?Digital Arrest Special Report : 'डिजिटल अरेस्ट'द्वारे कशी होतेय लोकांची फसवणूक?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  24  डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 24  डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget