एक्स्प्लोर

Marathi Actress Shubha Godbole Fight With Cancer: मेधा मांजरेकरांनंतर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीला कॅन्सरचं निदान; उपचारावेळचे गळालेले केस अन् त्यानंतरचे 'केमो कर्ल्स' केले फ्लॉन्ट

Marathi Actress Shubha Godbole Fight With Cancer: अभिनेत्रीनं सोशल मीडियावर तिच्या किमो थिअरपीनंतर आलेल्या 'केमो कर्ल्स'बाबत पोस्ट केली आणि अभिनेत्री जीवघेण्या कॅन्सरवर मात करत असल्याचं चाहत्यांना समजलं.

Marathi Actress Shubha Godbole Fight With Cancer: प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या पत्नी आणि अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि त्यांना कॅन्सर (Cancer)  झाल्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली. मेधा मांजरेकर यांना कॅन्सरचं निदान (Medha Manjrekar Diagnosed With Cancer) झालं असून त्यावर उपचार सुरू आहेत. पोस्टमधून त्यांनी उपचारांचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं चाहत्यांना सांगितलं. अशातच मेधा मांजरेकर यांच्यापाठोपाठ आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री (Marathi Actress) कॅन्सरच्या विळख्यात अडकल्याची माहिती मिळतेय. अभिनेत्रीनं सोशल मीडियावर तिच्या किमो थिअरपीनंतर आलेल्या 'केमो कर्ल्स'बाबत  (Chemo Curls)  पोस्ट केली आणि अभिनेत्री जीवघेण्या कॅन्सरवर मात करत असल्याचं चाहत्यांना समजलं. एकापाठोपाठ एक अशा दोन लाडक्या मराठी अभिनेत्रींना कॅन्सरचं निदान झाल्यामुळे इंडस्ट्री हादरली आहे. 

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभा गोडबोले (Marathi Actress Shubha Godbole) यांना कॅन्सरचं निदान झालं असून त्यावर त्या उपचार घेत आहेत. अशातच नुकतीच एक पोस्ट करुन त्यांनी केमोथिरेपीमुळे त्यांच्या गळालेल्या केसांवर भाष्य केलं. पण, त्यानंतर नव्यानं आलेल्या कुरळ्या केसांचं कौतुक वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांनी स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.  

मराठी अभिनेत्री शुभा गोडबोले पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाल्या? (Shubha Godbole On Diagnosed With Cancer)

शुभा गोडबोले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, "माझे नवीन कुरळे केस... माझ्या आधीच्या केसांपेक्षा अगदीच वेगळे आहेत. किमोथेरपीनंतर येणाऱ्या या कुरळ्या केसांना 'केमो कर्ल्स' म्हणतात, हे मला गुगल केल्यानंतरच कळलंय... किमोथेरपीदरम्यान पूर्णपणे केस गळून गेल्यानंतर जेव्हा पुन्हा केस येतात, ते अनेकांच्या बाबतीत कुरळे येतात. काहींचे केस नंतर पुन्हा आधीसारखे होतात, तर काहींचे कायम कुरळेच राहतात..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shubha Prashant (@shubhaprashant_official)

"बहुतेक माझे 'केमो कर्ल्स' आता कायमचेच राहणार आहेत! मात्र, मला अजूनही ठरवता येत नाही की, मला आधीचे केस जास्त आवडतात की, हे नवे कुरळे केस...", आपल्या नव्या लूकबद्दल शुभा गोडबोले यांची ही पोस्ट काहीशी गमतीशीर वाटत असली, तरीसुद्धा जीवघेण्या आजाराशी झुंज देताना त्यांनी सहन केलेल्या वेदनाही या पोस्टमधून स्पष्टपणे जाणवत आहेत.    

दरम्यान, अभिनेत्री शुभा गोडबोले म्हणजे, 'अग्गबाई सुनबाई', 'जाऊ नको दूर बाबा', 'दुर्गा', 'ट्रान्स अफेअर' आणि 'तुझेच मी गात आहे' यांसारख्या गाजलेल्या मालिका. तसेच, नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं प्रसिद्ध नाव. शुभा गोडबोले यांना गेल्या वर्षी कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या आता कॅन्सरविरोधातली लढाई लढत आहेत. खचून न जाता त्यांनी या जीवघेण्या आजाराचा मोठ्या धैर्यानं सामना केलाय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Medha Manjrekar Reaction On Cancer: 'कॅन्सरपेक्षा त्याचे उपचार जास्त वेदनादायी...'; कॅन्सरचं निदान अन् त्यानंतरचे उपचार, मेधा मांजरेकरांनी सांगितला 'तो' प्रवास

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget