एक्स्प्लोर

Shivani Rangole : 'त्यांच्या हसऱ्या आठवणींसोबत आता जगायचं आहे...', वीणा देव यांच्या निधनानंतर नातसूनेच भावनिक पोस्ट

Shivani Rangole : अभिनेत्री शिवानी रांगोळे हिने तिच्या आजेसासूबाई वीणा देव यांच्या निधानंतर भावनिक पोस्ट केली आहे.

Shivani Rangole : ज्येष्ठ मराठी लेखिका आणि अभिनेत्री मृणाल देव (Mrinal Dev) यांच्या मातोश्री वीणा देव (Veena Dev) यांनी सोमवार 29 ऑक्टोबर रोजी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 76व्या वर्षी वीणा देव यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधानानंतर त्यांची नातसून आणि अभिनेत्री शिवानी रांगोळेने (Shivani Rangole Kulkarni) भावनिक पोस्ट केली आहे. तसेच तिने त्यांच्या आठवणींनाही उजाळा दिलाय. वीणा देव या मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री होत्या. त्या नात्याने शिवानी ही त्यांची नातसून होती.  

डॉ.वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या.पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख काम केलं. तिथेच त्यांनी 32 वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. वीणा देव यांचे  प्राध्यापक विजय देव यांच्यासोबत लग्न झाले होते. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे म्हणून डॉ. विजय प्रल्हाद देव यांनी काम केले होते.

शिवानी पोस्ट काय?

शिवानीने वीणाताईंसोबतचे फोटो शेअर करत म्हटलं की, त्या नेहमी म्हणायच्या की आपल्या सवयी सारख्या आहेत. दोघींना सतत थंडी वाजत असायची म्हणून प्रवासात मोजे सोबत ठेवायची सवय, फुलांची आणि फुलं असणाऱ्या कपड्यांची प्रचंड आवड, पुस्तकांची प्रचंड आवड, दुपारची विश्रांती प्रिय!! बाहेर जेवायला गेलो तर शेअरिंग साठी नेहमी आमचा एक गट व्हायचा. मला शूटिंग करताना कुठलाही मराठी शब्द अडला तर मी हक्कानी कधीही फोन करायचे आणि त्या ही patiently मला शिकवायच्या. मध्यंतरी कागदावर कविता लिहून मला पाठवायच्या. माझी सीरियल अगदी हॉस्पिटल मध्ये सुद्धा न चुकता पाहायच्या!

पुढे तिने म्हटलं की, माझा आवाज बैलाच्या गळ्यातल्या घुंगरा सारखा आहे असं म्हणायच्या विराजसला. गमतीशीर किस्से सांगताना डोळ्यांत चमक यायची त्यांच्या. गो.नी. दांचं भ्रमणगाथा वाचताना मी भारावून जाऊन फोन/msg करायचे तेव्हा खूप आनंद व्हायचा त्यांना. हा वारसा जपायचा आहे तुम्ही असं प्रेमानी सांगायच्या. त्यांच्यातला शांतपणा, सात्विक भाव आणि विचारांची श्रीमंती मृणाल ताई, मधुरा मावशी, विराजस आणि राधा मध्ये पुरेपूर जाणवते. त्यांचा कठीण काळ विसरून, फक्त आणि फक्त त्यांच्या ह्याच हसऱ्या आठवणी सोबत घेऊन आता जगायचे आहे. त्या बघत आहेत, त्यांना कौतुक असणार आहे म्हणून काम करण्याचा हुरूप यायचा आणि येईल, इथून पुढे नेहमीच!  

View this post on Instagram
 
A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)

ही बातमी वाचा : 

अभिनेत्री मृणाल कुलकर्णींना मातृशोक, सोशल मीडियावर भावुक पोस्ट; म्हणाल्या, "शेवटपर्यंत ती..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tuljapur News : तुळजानगरी भाविकांंनी गजबजली, सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविक तुळजापुरात #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 25 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 25 December 2024 माझा गाव, माझा जिल्हाTop 70 at 7AM Superfast 25 December 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले, प्रक्षाळ पुजेनंतर मंदिर होणार भाविकांसाठी बंद, प्रशासनाचे आदेश
Astrology : आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
आज नाताळच्या मुहूर्तावर बनले मोठे शुभ योग; 5 राशींच्या नशिबाला लागणार चार चाँद, विविध मार्गांनी होणार बक्कळ धनलाभ
IPO Update : टाटांच्या आणखी एका कंपनीचा 17000 कोटींचा आयपीओ येणार, बातमी समोर येताच टाटांच्या शेअरमध्ये तेजी 
Tata Capital : टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार, भांडवली बाजारातून 17000 कोटी रुपयांची उभारणी?
Ramtek Bungalow : रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
रामटेक बंगल्याचं 'ट्रॅक रेकॉर्ड' अपशकुनी? बावनकुळे की पंकजा मुंडे, मुक्कामासाठी कोण सज्ज होणार?
Horoscope Today 25 December 2024 : आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नाताळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Kokan Refinary : कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
कोकणात रिफायनरी होणार, पण बारसूत की नाणारमध्ये? मुख्यमंत्र्यांचा कौल कोणत्या ठिकाणाला? 
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
शिर्डीत दर्शन घेऊन परतताना समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, कारचा चेंदामेंदा; तीन ठार 3 जखमी
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू... हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा; व्हिडिओ व्हायरल
Embed widget