अभिनेत्री मृणाल कुलकर्णींना मातृशोक, सोशल मीडियावर भावुक पोस्ट; म्हणाल्या, "शेवटपर्यंत ती..."
Mrinal Kulkarni Mother Passed Away : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची आई डॉ. वीणा देव यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर त्यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे.
Mrinal Kulkarni Mother Veena Dev Passed Away : लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना मातृशोक झाला आहे. मृणाल कुलकर्णीच्या आईचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची आई डॉ. वीणा देव यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. त्या आजारी होत्या, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अभिजात साहित्य लिलया हाताळणाऱ्याडॉ. वीणा देव या सुप्रसिद्ध लेखिका समीक्षक होत्या. यासोबतच, त्या लेखक गो.नी. दांडेकर यांची कन्या आणि अभिनेत्री मृणाल कुलवर्णी यांच्या आई होत्या. आईच्या निधनानंतर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णींना मातृशोक
डॉ. वीणा देव या पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख पदावर कार्यरत होत्या. त्यांनी 32 वर्ष या ठिकाणी ज्ञानाचे धडे दिले आहेत. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबासह साहित्या विश्वावर शोककळा पसरली आहे. आईच्या निधनानंतर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहे. दिवगंत आईसाठी मृणाल कुलकर्णी यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे.
सोशल मीडियावर भावुक पोस्ट
मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलंय, 'खरंतर आत्ता काही व्यक्त होण्याची ताकद नाही. आईला तिच्या कठीण काळात प्रेम देणाऱ्या, वेळी अवेळी एका फोनवर धावून येणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मी आणि मधुरा तुमच्यामुळे हसरा चेहरा ठेवून अवघड कामगिरी पार पाडू शकलो. आईला फुलांची प्रचंड आवड. शेवटपर्यंत ती त्याच फुलांप्रमाणे चेहऱ्यावर प्रसन्न हसू ठेवून जगली. तिची उणीव जरी भासली तरी तिने जोडलेल्या मोठ्या मित्रपरिवाराच्या रुपानी, तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रूपानी तिची सोबत कायम असेल. आशीर्वाद असावा!'
म्हणाल्या, "शेवटपर्यंत ती..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :