एक्स्प्लोर

Akshay Waghmare : ‘महाराष्ट्रात राहून मातृभाषेसाठी झगडावे लागतेय...’, अभिनेता अक्षय वाघमारेची पोस्ट चर्चेत!

Sher Shivraj : ‘महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हणत, निषेध व्यक्त केला आहे.

Sher Shivraj : नुकताच सोशल मीडियावर ‘हिंदी’ विरुद्ध ‘साऊथ’ असा वाद पाहायला मिळाला. एकीकडे ‘हिंदी’वरून वाद सुरु असताना, दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातच ‘मराठी’ची गळचेपी होताना दिसतेय. नुकताच ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल सुरु आहेत. मात्र, या सगळ्यात ‘शेर शिवराज’ फेम अभिनेता अक्षय वाघमारेची (Akshay Waghmare) सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

‘शेर शिवराज’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता अक्षय वाघमारेने सोशल मीडियावर एक जळजळीत पोस्ट शेअर केली आहे. ‘महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही’, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हणत, निषेध व्यक्त केला आहे.

काय म्हणाला अक्षय वाघमारे?

‘जाहीर निषेध! पोस्ट कॅप्शन वाचा’, असे म्हणत अक्षयने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तो म्हणतो, ‘नमस्कार पोस्ट मोठी आहे, पण अत्यंत महत्वाची आहे. मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम.. मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. याविषयी यापूर्वी देखील अनेकदा या विषयी बोलले गेले आहे. पण, पुढे काहीच साध्य झाले नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट शेर शिवराज हा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा एकच उद्देश होता की, महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा, नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा.’

मराठी चित्रपटांची गळचेपी

पुढे तो लिहितो, ‘स्वराज्याची स्थापना ते परकीयांचे आक्रमण या आणि अनेक बाबी या चित्रपटांद्वारे मांडल्या गेल्या आहेत आणि मराठी जनतेने उत्स्फुर्तपणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला. आता सुद्धा महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते. पण, तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शो चे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स. सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे.

चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत या सगळ्याचा विचार कोण करणार?? आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल, तर या संदर्भात आवाज उठवायला नको का?? जी व्यवस्था हे सगळं बघत आहेत त्यांनी या विषयी काहीतरी धोरण अवलंबनार आहेत की नाही? नाही तर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करतांना निर्माते देखील 10 वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील.’

महाराष्ट्रात ही परिस्थिती तर...

‘मराठी माणसाने म्हणजे सन्मानीय दादा साहेब फाळके यांनी हि चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत. जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल, तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे, तर इतर चित्रपटांबद्दल बद्दल काय बोलणार???

बस झाला यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही ... मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे...प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे...’, असा संताप या पोस्टमध्ये अक्षयने व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad : वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
Vijay Wadettiwar : पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
Walmik Karad surrender: अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Surrender Pune CID : गाडी आली, वाल्मिक कराड उतरला, CID कार्यालयातील Uncut VIDEOWalmik Karad Surrender to Pune CID :  वाल्मिक कराडने पुण्यात सीआडीसमोर केलं आत्मसमर्पणWalmik Karad EXCLUSIVE : शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराड काय म्हणाला? शब्द अन् शब्द जसाच्या तसा!Pune CID : Walmik Karad पुण्यात CID ला शरण येणार, सीआयडी ऑफिसबाहेर बंदोबस्त वाढवला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad : वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
दादा, तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक; प्राजक्ता म्हणाली, सुरेश धसांविरूद्ध कारवाई नाही
Vijay Wadettiwar : पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
पुरावे नष्ट केल्यावर वाल्मिक कराडने सरेंडर केलं? त्यांची हिंमत तर इतकी की....; विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल 
Walmik Karad surrender: अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन CID कार्यालय गाठलं, वाल्मिक कराडचा ठावठिकाणा सहकाऱ्याने सांगितला!
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त ; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?
Walmik Karad: हा खेळखंडोबा नको; शरणागतीनंतर संभाजीराजे संतप्त ; CM फडणवीस अन् अजित पवारांना थेट सवाल?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?
वाल्मिक कराड पिच्चरटाईप गाडीतून आला अन् पोलिसांना शरण गेला; पुण्यात आलेली ती स्कॉर्पिओ कोणाची?
वाल्मिक कराड शरण आला नसता तर..., पोलीस अन् सीआयडीच्या कामावर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
वाल्मिक कराड शरण आला नसता तर..., पोलीस अन् सीआयडीच्या कामावर प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली शंका, नेमकं काय म्हणाले?
Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
वाल्मिक कराडांनी पुण्यात सरेंडर करताच मुंबईत हालचालींना वेग; सुरेश धस-संदीप क्षीरसागर फडणवीसांच्या भेटीला
Embed widget