Shefali Jariwala Took IV Drip On Her Death Day: शेफालीचा मृत्यू 'त्या' आयव्ही ड्रिपमुळे? मृत्यूला तीन दिवस उलटल्यानंतर जवळच्या मैत्रिणीचा मोठा खुलासा
Shefali Jariwala Took IV Drip On Her Death Day: शेफाली जरीवालाच्या मृत्यूला काही दिवस उलटून गेलेत, पण तिचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही. अशातच आता तिच्या मैत्रीणीनं मोठा खुलासा केला आहे.

Shefali Jariwala Took IV Drip On Her Death Day: 'काँटा लगा' गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala) हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) निधन झालं. वयाच्या 42व्या वर्षी शेफालीनं जगाचा निरोप घेतला. शेफालीचं असं अचानक जाणं जेवढं तिच्या कुटुंबीयांसाठी धक्का आहे, तेवढाच धक्का इंडस्ट्रीसाठीही आहे. शेफालीचं पोस्टमार्टम झालं असून अजून तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालेलं नाही. अशातच शेफालीचा मृत्यू अँटी-एजिंग ट्रिटमेंटमुळे झाल्याचं बोललं जात आहे. शेफालीच्या मृत्यूचं खरं कारण (Real Cause Of Shefali's Death) समोर येण्यासाठी आता साऱ्यांना फायनल पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे. या सर्वांमध्ये, शेफालीची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री पूजा घई हिनं अलीकडेच पत्रकार विकी लालवानी यांच्याशी शेफालीच्या मृत्यूबद्दल काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला.
शेफालीच्या अँटी एजिंग ट्रिटमेंटबाबत पूजा घई काय म्हणाली?
विकी लालवानीशी बोलताना पूजा घईनं सांगितलं की, "मला वाटतंय की, कोणावरही वैयक्तिकरित्या भाष्य करणं योग्य नाही... पण, मला वाटतं की, प्रत्येकजण अँटी-एजिंग ट्रिटमेंट घेतो आणि मला खात्री आहे की, प्रत्येकासाठी ते आवश्यक आहे आणि ते खूप सामान्य आहे. जर तुम्ही दुबईमध्ये रस्त्यावर फिरत असाल तर तुम्हाला रेग्युलर क्लिनिक आणि रेग्युलर सलूनमध्ये व्हिटॅमिन सीचे अनेक ड्रिप दिसतील." ती म्हणाली की, शेफाली नेहमीच सर्वात सुंदर दिसायची. ज्यावेळी तिचं पार्थिव तिच्या अंत्यसंस्कारासाठी घरी आणलं गेलं, त्यावेळीही ती फारच सुंदर दिसत होती."
View this post on Instagram
शेफालीनं 'त्या' दिवशी व्हिटॅमिन सी ड्रिप घेतलेली?
पूजा घई बोलताना म्हणाली की, "शेफालीनं तिच्या मृत्यूच्या दिवशीच व्हिटॅमिन सी ड्रिप घेतली होती. व्हिटॅमिन सी घेणं ही एक सामान्य गोष्ट आहे... काही लोक फक्त एक गोळी घेतात आणि काही लोक ते आयव्ही ड्रिपद्वारे घेतात. तर, हो, तिने त्या दिवशी आयव्ही ड्रिप घेतलेली"शेफालीने ड्रिप कधी घेतला याबद्दल विचारले असता, पूजा म्हणाली, "त्याबद्दल खात्री नाही. पण मला माहीत आहे की, तिनं त्या दिवशी ते घेतलेलं कारण... पोलिसांनी तिला आयव्ही ड्रिप देणाऱ्या व्यक्तीला फोन केला होता, फक्त ती कोणतं औषध घेत होती, हे तपासण्यासाठी आणि नंतर असं उघड झालं की, तिनं आज आयव्ही ड्रिप घेतलेली."
पूजा घईला शेफालीची बहीण समजलेले अनेकजण
अभिनेत्री पूजा घई दुबईत राहाते. पण, ज्यावेळी शेफालीचं निधन झालं त्यावेळी ती मुंबईत होती. शेफालीच्या अंत्यसंस्काराचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये अनेकांना पूजा घई शेफालीची बहिण शिवानी वाटली. दरम्यान, सध्या शेफालीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि तिच्या अचानक मृत्यूमागील खऱ्या कारणाचा उलगडा होण्यासाठी सर्वजण तिच्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























