Pooja Ghai Opens Up On Shefali Jariwalas Death Truth: 'पल्स सुरू होत्या, पण डोळे बंद होते... '; शेफाली जरीवालाच्या 'त्या' शेवटच्या क्षणी काय-काय घडलेलं मैत्रीणनं सगळं सांगितलं!
Pooja Ghai Opens Up On Shefali Jariwalas Death: शेफालीनं वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शेफालीचं असं अचानक जाणं जेवढं तिच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायी होतं, तेवढंच तिच्या मित्रमंडळींसाठी आणि चाहत्यांसाठीही धक्कादायक होतं.

Pooja Ghai Opens Up On Shefali Jariwalas Death: प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री (Famous Television Actress) शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचं 28 जून रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन (Heart Attack) झालं. शेफालीचं असं अचानक जाणं साऱ्यांसाठीच धक्का होता. शेफालीला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. 'काँटा लगा' या म्युझिक अल्बममधून प्रसिद्धीझोतात आलेल्या शेफालीनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण, दैवाचा खेळ कधीच कुणाला कळत नाही म्हणतात ना... तसंच काहीसं शेफालीच्याबाबतीत झालं. शेफालीनं वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शेफालीचं असं अचानक जाणं जेवढं तिच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायी होतं, तेवढंच तिच्या मित्रमंडळींसाठी आणि चाहत्यांसाठीही धक्कादायक होतं. अशातच आता शेफालीची अत्यंत जवळची मैत्रीण पूजा घईनं तिच्या मैत्रीणीच्या त्या शेवटच्या क्षणांबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. याबाबत शेफालीचा पती पराग त्यागीनं तिला सांगितल्याचंही तिनं सांगितलं.
शेफालीच्या मृत्यूच्या दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा
शेफाली जरीवालाच्या 'त्या' शेवटच्या क्षणांचा उल्लेख करताना पूजा घई म्हणाली की, "मला तिच्या कुटुंबीयांनी आणि परागनं जे सांगितलं त्यानुसार, त्यांच्या घरात सत्यनारायणाची पूजा होती. पुढच्या दिवशी जेव्हा शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घरात जाण्याची परवानगी देण्यात आली, त्यावेळी मी पाहिलं की, संपूर्ण घर पूजेसाठी सजवण्यात आलेलं. पण, त्यानंतर जे झालं, त्यानं सर्वांना हादरवून सोडलं."
त्या दिवशी शेफालीसोबत नेमकं काय घडलं?
पूजानं सांगितलं की, "शेफाली नेहमीप्रमाणे जेवली आणि तिनं परागा तिच्या कुत्र्याला खाली फिरवायला न्यायला सांगितलं. जसा पराग खाली गेला, त्याला लगेचच वरती बोलावलं गेलं. घरातल्या हेल्परनं त्याला फोन केला आणि म्हणाली, "दिदीची तब्येत ठीक नाही..." परागनं कुत्र्याला हेल्परकडे देऊन त्याला फिरवायला सांगितलं आणि तो वरती शेफालीकडे गेला. कारण, त्यांचा कुत्रा आता म्हातारा झाला आहे. जसा हेल्पर खाली आला, पराग वरती शेफालीकडे गेला. घरात जाऊन त्यानं पाहिलं की, शेफालीची पल्स सुरू होती, पण ती डोळे उघडत नव्हती. त्याला लगेच काहीतरी गडबड झाल्याचं लक्षात आलं असावं आणि त्यानं तिला जवळच्या रुग्णालयात नेलं असावं. पण तिला बेलेव्ह्यू हॉस्पिटलला आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता."
परागची खूप चिंता वाटतेय : पूजा घई
अभिनेत्री पूजा घई विक्की लालवानीशी पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं की, "तिची मैत्रीण शेफाली जरीवालाचा ज्यावेळी पोस्टमार्टम रिपोर्ट केला, त्यावेळी त्यामध्ये काहीच गडबड आढळली नाही. मला सर्वात जास्त काळजी परागची वाटत होती, कारण त्याला पोलीस चौकशीला सामोरं जावं लागणार होतं. खरं तर, शेफालीच्या जाण्यामुळे पराग आधीच खूप दुःखी आहे आणि आता त्याला काही काळासाठी एकटं राहायचंय. पण, त्याला एवढ्या दुःखातही पोलीस चौकशीचा सामना करावा लागणार आहे."
View this post on Instagram
पूजा घईनं सांगितलं की, "पोलीस आपलं काम करत आहेत, पण मी अशा अनेक घटनांमध्ये पाहिलंय की, अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या सर्वात वाईट काळात या सर्व गोष्टींमधून जावं लागणार आहे. त्यांना कित्येक महिन्यांपर्यंत पोलीस चौकशी आणि त्यासोबतच मिडिया प्रेशरचा सामना करावा लागतो. त्यांना आपलं दुःख समजून घेण्याचाही वेळ मिळत नाही. सतत मिडिया आणि पोलीस दोघांची नजर त्यांच्यावर असते आणि काही महिने यासर्व गोष्टींमध्ये असे निघून जातात की, त्यांना दुःख व्यक्त करायचाही वेळ मिळत नाही. मला फक्त एवढंच वाटतंय की, परागनं या सर्व परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर यावं, त्याला स्वतःसाठी वेळ हवाय, त्याला आपल्या वेदना समजून घेण्यासाठी वेळ हवाय..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं कारण समोर, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये सर्वात मोठा खुलासा























