Sharman Joshi Kareena: शरमन जोशीचं खऱ्या आयुष्यात करिना कपूरसोबत खास नातं; तुम्हाला माहितीय?
या सिनेमात राजू रस्तोगी आणि पिया हे मित्र म्हणून दिसले असले तरी खऱ्या आयुष्यात शर्मन जोशी आणि करीना कपूर यांचं खास नातं आहे

Sharman Joshi Kareena Kapoor: थ्री इडीयट्समधील रँचोचा जिवलग मित्र राजू रस्तोगी आठवतोय? आणि दुसऱ्या बाजूला रँचोची गर्लफ्रेंड म्हणजेच पिया. राजू रस्तोगीची भूमिका अभिनेता शर्मन जोशी यांनी तर पियाची भूमिका करीना कपूरने साकारली होती.या दोघांच्याही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. थ्री इडियट्स (3 Idiots) या सिनेमात राजू रस्तोगी आणि पिया हे मित्र म्हणून दिसले असले तरी खऱ्या आयुष्यात शरमन जोशी आणि करीना कपूर यांचं खास नातं आहे. हे दोघे प्रत्यक्षात एकमेकांचे नातेवाईक आहेत हे अनेकांना ठाऊक नाही.
काय आहे बेबो अन् शर्मनमध्ये नातं?
करीना कपूरची आजी आणि शरमन जोशीची सासू या एकमेकींच्या सख्ख्या बहिणी होत्या. त्यामुळे करीना कपूरचे वडील रणधीर कपूर आणि शरमन जोशीची पत्नी प्रेरणा या दोघी बहिणी आहेत. हे नातं वाचताना थोडं गुंतागुंतीच वाटू शकतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शरमन जोशी यांची सासू आणि कृष्णा कपूर या सख्या बहिणी. कृष्णा कपूर म्हणजे राज कपूर यांची पत्नी आणि रणधीर कपूर यांची आई. रणधीर कपूर हे करीना कपूरचे वडील. त्यामुळे कृष्णा कपूर या शरमन जोशींच्या मावस सासू होतात. कृष्णा कपूर यांची नात म्हणजे करीना कपूर.
View this post on Instagram
शरमन जोशी हे प्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा यांचे जावई आहेत. प्रेम चोप्रा यांच्या पत्नी उमा चोप्रा या कृष्णा कपूर यांची सख्खी बहिण. म्हणजेच राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर या शरमन जोशी यांच्या मावस सासूबाई झाल्या. आणि कृष्णा कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर व त्यांची मुलगी करीना कपूर. ऑनस्क्रीन राजू आणि पिया जरी फक्त मित्र म्हणून दिसले असले तरी ऑफ स्क्रीन ते नातेवाईक आहेत.
























